घरमुंबईमंत्रालयात कर्जबाजारी महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात कर्जबाजारी महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

आत्महत्या करणाऱ्या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास आणि महिलेची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. सावकारी कर्जाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या करण्याच प्रयत्न केला. आज दुपारी मंत्रालयाच्या प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या महिलेची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे

सावकारी कर्जामुळे आत्महत्येचा प्रयत्न

शारदा अरुण कांबळे (४५ वर्ष) असं या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ही महिला चेंबूर येथील लाल डोंगर येथे राहते. या महिलेवर सावकारी कर्ज असून त्याचा वाद न्यायालयात सुरु आहे. या महिलेने आज दुपारी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेद्वाराजवळ अंगावर रॅाकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच वेळेस मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वरावर सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास आणि महिलेची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisement -

याआधी घडली होती अशीच घटना

ज्या मंत्रालयातून राज्याचा गाडा हाकला जातो ते मंत्रालय आहे की, आत्महत्यालय असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडू लागला आहे. असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडू लागला आहे. धर्मा पाटील यांची आत्महत्या तसेच हर्षल पाटील यांनी मंत्रालयात केलेल्या आत्महत्येनंतर आता मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ७ जानेवारीला एका तरुणाने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या घटनाामुळे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे तरुण सुरक्षित वाचला. लक्ष्मण चव्हाण असं या तरुणाचे नाव होते. तो प्रजासत्ताक भारत या पक्षाचा कार्यकर्ता असून विविध मागण्यांसाठी त्याने आत्महत्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -