घर मुंबई डॉ. विनोद पाटील यांनी स्वीकारला संचालकपदाचा पदभार

डॉ. विनोद पाटील यांनी स्वीकारला संचालकपदाचा पदभार

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या डॉ. विनोद पाटील यांची परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा पदभार जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. विनोद पाटील यांनी स्वीकारला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ.सुनील भिरुड उपस्थित होते. डॉ. विनोद पाटील यांनी डॉ. अर्जुन घाटूळे यांच्याकडून पदभार स्वीकारला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते आणि कार्यात पारदर्शकता राहते’. या तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना अनेक सेवासुविधा दिल्या जाव्यात, अशी अपेक्षा कुलगुरुंनी व्यक्त केली.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नोबेल मिळवावे

काय म्हणाले डॉ. सुहास पेडणेकर?

- Advertisement -

डॉ. सुहास पेडणेकर यांनी परीक्षा विभागाचे मावळते संचालक डॉ. अर्जुन घाटूळे यांचा गौरव केला. यावेळी ते म्हणाले की, ‘अर्जुन घाटूळे यांनी विद्यापीठाला कठीण प्रसंगातून बाहेर काढले आहे’. आणीबाणीची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळल्याबद्दल डॉ. सुहास पेडणेकर यांनी त्यांचे मनापासून आभार.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठाकडे मराठी भाषांतरकार नाही

कोण आहेत डॉ. विनोद पाटील?

- Advertisement -

डॉ. विनोद पाटील हे जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सिस्टम अॅनालिस्ट या पदावर कार्यरत होते. २०१२ ते २०१३ मध्ये ते मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात उपकुलसचिव म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी मास्टर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंटची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली असून, कम्प्युटर मॅनेजमेंट या विषयात त्यांनी पीएचडी केली आहे.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठात स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिंनी जखमी

- Advertisment -