घरमुंबईमेट्रो प्रकल्पांचे काम वेगाने

मेट्रो प्रकल्पांचे काम वेगाने

Subscribe

वेळेत काम करण्याचे एमएमआरडीएचे उदिष्ट

मुंबई मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या प्रकल्पाचे काम वेगवान पद्धतीने सुरू आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणार असून पुढील वर्षी हे दोन्ही मेट्रो प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाशी संबंधित कामे वेगाने होत असून वेळेवर काम पूर्ण करण्याकडे भर दिला जात आहे असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

मेट्रो 2A, 2Bआणि मेट्रो 7 या मार्गावरील मेट्रो कोचसाठी भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड ( BEML) यांना कंत्राट देण्यात आले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत हे काम होणार आहे. 3,816 कोटी रुपयांचे हे कंत्राट असून 504 मेट्रो कोचची निर्मिती होत आहे. सहा कोचची पहिली प्रोटोटाइप मेट्रो जुलै 2020 पर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या मेट्रो मार्गावर चाचणी सुरू होईल.

- Advertisement -

मेट्रोच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. मेट्रो मार्ग 2A, 2B आणि 7 यांवरील सिग्नल आणि संवाद यंत्रणेसाठी अलस्टॉम लिमिटेड यांना 517 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. याबाबतचा करार 8 मार्च 2019 रोजी करण्यात आला असून 45 महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी एमएमआरडीएने काळजी घेतली आहे. एमएमआरडीएने अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स (PSD)चे काम सुरू आहे. PSD च्या कामासाठी 87. 06 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

- Advertisement -

स्वयंचलित भाडे संकलन (AFC) यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याकामी 159.99 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याचे कंत्राट डेटामॅटिक्स यांना देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यास 50 महिन्यांचा अवधी लागणार आहे. या कामाचा करार मे 2019 मध्ये करण्यात आला होता. AFC ची डिटेल डिझाइनचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मेट्रो स्थानकात स्वयंचलित दरवाजे, तिकीट वेंडिंग मशीन, ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन आदींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

त्याशिवाय, मेट्रो 7 साठीच्या वीज पुरवठा, SCADA, ओव्हरहेड वायर आणि त्यासंबंधीची कामे, इलेक्ट्रिकल आणि मेक्निकल यंत्रणेची कामे, स्वयंचलित जिने, लिफ्ट आदी कामांचे कंत्राट देण्यात आले आहेत. ही कामे 14 ते 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होतील.

मेट्रो 4 आणि 4 Aच्या विकास कामांसाठी च्या खरेदी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो 4 आणि 4 A शी संबंधित कामे वेगवान गतीने सुरू आहेत. रोलिंग स्टॉक व सिग्नलिंग व ट्रेन कंट्रोल आदीबाबतच्या कामांचे करार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 20 डिसेंबर 2019 रोजी रोलिंग स्टॉकची निविदा काढण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -