घरCORONA UPDATECoronaEffect: कोरोना रुग्ण सापडल्याने वरळी कोळीवाडा सील

CoronaEffect: कोरोना रुग्ण सापडल्याने वरळी कोळीवाडा सील

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासात वरळी कोळीवाडा या भागात कोरोनाची लागण झालेले ५ रुग्ण आढळून आले आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ४८ तासात वरळी कोळीवाडा या भागात कोरोनाची लागण झालेले ५ रुग्ण आढळून आले आहेत. तर आणखी २ – ३ जण संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाड्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळपासूनच वरळी कोळीवाडा सील करण्यात आला आहे. या गंभीर घटनेची दखल स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत संपर्क करून सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. कोरोना बाधितांमुळे संपूर्ण वरळी कोळीवाड्यातील अंदाजे ९० हजार नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने सोमवारी वरळी कोळीवाडा संपूर्णपणे सील करण्यात आला आहे.

वरळी कोळीवाड्यात पाळला जातोय कडक कर्फ्यू

वरळी कोळीवाड्यात पाळला जातोय कडक कर्फ्यू

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 30, 2020

- Advertisement -

परदेशात न गेलेल्या व्यक्तींना कोरोना

वरळी कोळीवाड्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे वरळीत सध्या भितीचे वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित ५ आणि संशयित ३ यांपैकी एकहीजण परदेशात गेलेले नव्हते. त्यामुळे आता या सर्वांना कोरोनाची बाधा नेमकी कशी झाली? याचा शोध घेतला जात आहे. या ५ व्यक्तींपैकी एक व्यक्ती ट्राॅम्बे परिसरात आचारीचे (जेवण बनवणे) काम करत होता. कदाचित हा व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने तसेच या व्यक्तीच्या संपर्कात अन्य व्यक्ती आल्याने कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या भावाला तर त्याच्या मुलाला या व्यक्तीच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे समजते. तसेच एक मुलगा वगळला तर उर्वरित सर्वजण ५० वर्षांवरील आहेत. पण इतर चौघे जण ही स्थानिक परिसरातच काम करणारे आहेत. या पाच जणांच्या संपर्कात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालिका आरोग्य विभागातील अधिकार्याने सांगितले. या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा –

Coronavirus: विमानातून आलेल्या लोकांच्या अंगावर सॅनिटायझर का नाही फवारलं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -