घरनवी मुंबईएपीएमसी मार्केटच्या पुर्नविकासासाठी १०० दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

एपीएमसी मार्केटच्या पुर्नविकासासाठी १०० दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

Subscribe

वाशी येथील मोडकळीस आलेल्या एपीएमसी मार्केटच्या पुर्न विकासासाठी येत्या १० दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन १०० दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

नवी मुंबई: एपीएमसीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. कांदा बटाटा बाजारात काही इमारती आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट आहेत. वाशी येथील मोडकळीस आलेल्या एपीएमसी मार्केटच्या पुर्न विकासासाठी येत्या १० दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन १०० दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. (100 Days Action Plan for Redevelopment of APMC Market)

आज मंगळवारी मंत्री सत्तार यांनी वाशीतील एपीएमसी मार्केटला भेट दिली.यावेळी त्यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय अधिकारी आणि माजी सभापती, संचालक सदस्य, व्यापार्‍यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.त्याच प्रमाणे शेतकरी, माथाडी मापाडी यांना भेडसाविणार्‍या समस्या जाणून घेत बाजार समितीची पाहणी केली.मागील महिन्यात मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजार आवारातील एफ विंग मध्ये इमारतीचा सज्जा कोसळला. या दुर्घटनेची दखल घेऊन नवी मुंबई महापालिका अधिकार्‍यांनी थेट एपीएमसी सचिवांना नोटीस पाठवून कांदा-बटाटा मार्केट रिकामे करण्याचे निर्देश दिले होते.२० जुलै रोजी पालिकेचे पथक धोकादायक गाळे रिकामे करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घेऊन पोहोचले. मात्र, कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापार्‍यांनी प्रखर विरोध केला होता. त्यानंतर एपीएमसीचे सचिव राजेंद्र भुसारे यांच्या समवेत व्यापार्‍यांनी बैठक घेऊन चर्चा करुन गाळे खाली करण्यासाठी स्थगिती मिळवली होती.

- Advertisement -

दरम्यान पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी एपीएमसी मार्केटला भेट देऊन बाजार संकुलाची पाहणी केली. मार्केटची पुर्न विकासासाठी सरकार कटिबध्द असून सर्वात मोठी बाजार पेठ आणि आर्थिक उलाढाल असणार्‍या बाजार संकुलाच्या नव्या निर्माणसाठी सरकार आणि बाजार कमिटी सदस्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेऊन यासाठी सकारात्मक पावले उचलणार असल्याचे सत्तार म्हणाले.एखादा अनुचित प्रकार घडण्या आधी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून अनेक वर्षापासून अडीअडणीत अडकलेल्या शेतकरी व्यापारी वर्गाला पुर्नविकासातून विकासाचा मार्गा खुला करणार असल्याचे म्हणाले.

एपीएमसी मार्केमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असल्याच्या तक्रारीवर आपण त्याची शहानिशा करुन पुढील कारवाई करण्याचे संकेतही मंत्री सत्तार यांनी दिले.

कांदा प्रश्नी केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल

केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याने राज्यात कांदा व्यापारी संघटनेकडून सरकारचा निषेध केला जात आहे. याबाबत बोलताना राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे दिल्लीला जाऊन आले. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अमित शहा व केंद्रीय कृषी मंत्र्यांपर्यंत राज्यातील शेतकर्‍यांच्या भावना पोहहचवल्या आहेत. केंद्र सरकारने २ लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा प्रश्नी शेतकर्‍यांचा दिलासा देणार अंतिम निर्णय केंद्र सरकार येईल, असेही मंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

( हेही वाचा: अन् क्षणार्धात देशाचे व्हॉट्सअॅप स्टेटस बदलले; “CHADRAYAN 3” यशस्वीतेनंतर चैतन्य )

 

राज्यातील कांद्याच्या निषेधार्थ बंदला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीने देखील बंदची हाक दिली होती. परंतु नाशिक येथील बाजार समिती सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसीने देखील शेतकर्‍यांची कोणतीही असुविधा होऊ नये म्हणून उद्या गुरुवार २४ रोजीचा बंद मागे घेतला आहे, अशी माहिती काळजी वाहू सभापती अशोक डक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -