घरनवी मुंबईगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एपीएमसीत हापूसचा श्री गणेशा! विधीवत पूजन करून विक्रीला सुरूवात

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एपीएमसीत हापूसचा श्री गणेशा! विधीवत पूजन करून विक्रीला सुरूवात

Subscribe

हापूस आंबा म्हटलं की, सर्वप्रथम आठवतो तो कोकणची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंबा. कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेत हजेरी लावली आहे.

हापूस आंबा म्हटलं की, सर्वप्रथम आठवतो तो कोकणची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंबा. कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेत हजेरी लावली आहे. यंदाही हापूस आंब्याने बाजारात प्रवेश केला असून प्रथेप्रमाणे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या फळ बाजारात शनिवार, २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विधिवत पूजन करून ग्राहकांसाठी आंबा विक्रीला नेण्यात येणार आहे. हापूस आंब्याच्या बाजारात विक्री स्पर्धा सुरू झाल्यानंतर हापूस आंब्याचे किरकोळ बाजारातील आगमन जानेवारीपासून सुरू झाले आहे. परंतु कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाचे आगमन हे गुढी पाडव्यापासून करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला विधिवत हापूस आंबा झाडावरून उतरवून त्याचा देवाला नैवेद्य दाखवून आंबा बाजारात विक्रीसाठी शेतातून पाठवतात. एपीएमसीतील घाऊक बाजारातील व्यापारीही गुढी पाडव्यापासूनच आंबा विक्रीला सुरुवात करणार आहे.

कोकणात हापूस आंब्याचा यंदा मोहर चांगला आला आहे. परंतु हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे या मोहराचे फळात रुपांतर कमी झाले आहे. तरीही यंदा हापूस आंब्याचे उत्पादन मागील वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जानेवारीपासून हापूस आंब्याची आवक सुरु झाली. एपीएमसी मार्केटमधील फळ बाजारात सध्या दिवसाला २० ते २५ हजार हापूस आंब्याच्या पेट्या दाखल आहेत.

- Advertisement -

गुढी पाडव्यापासून आंब्याच्या आवकमध्ये वाढ होणार असून कोकणातील आंबा बागातयदार हापूस आंबा याच दिवशी नवी मुंबईलगत असणाऱ्या मुंबई व पुण्याच्या घाऊक बाजारात पाठविण्याची पद्धत आहे. ४० ते ४५ वर्षांपूर्वी हा आंबा बोटीतून मुंबईत येत होता. पण आता वाहतूक व्यवस्था सुकर झाल्याने कोकणातील तीन जिल्ह्यातून हापूस आंबा मुंबईच्या बाजारात आला आहे. हंगामातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या आंबा फळाचे पूजन गुढी पाडव्याला केले जाते. अनेक वर्षांची परंपरा आजही सुरू आहे.
– संजय पानसरे, संचालक, एपीएमसी

मागील दोन ते अडीच वर्षापासून कोरोनाच्या लॉकडॉऊनमुळे हापूस आंब्याच्या विक्रीसाठी अनेक अडचणी येत होत्या. बाजारपेठा बंद असल्याने मागील दोन वर्षापासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या तिसरा लाटेनंतर परिस्थिती पूर्णपणे संपुष्टात येताना दिसत असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

WHO : कोरोना लस आणि कर्णबधीरपणाचा काय संबंध ? WHO च्या अभ्यासाला सुरूवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -