घरनवी मुंबईदेशातील संस्कृतीचे नवी मुंबई केंद्र; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे गौरवोद्गार

देशातील संस्कृतीचे नवी मुंबई केंद्र; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे गौरवोद्गार

Subscribe

नवी मुंबईत देशतील विविध राज्यातून आलेले देश बांधव वास्तव्यास आहेत. या शहरात सर्वच राज्याची ओळख निर्माण करुन देणार्‍या वास्तू आहेत. त्या वास्तूमधून कला, संस्कृती, परंपरा जपणारे विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे नवी मुंबई हे देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे केंद्र असल्याचे गौरवोद्गार राज्याचे विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी काढले.

नवी मुंबई: नवी मुंबईत देशतील विविध राज्यातून आलेले देश बांधव वास्तव्यास आहेत. या शहरात सर्वच राज्याची ओळख निर्माण करुन देणार्‍या वास्तू आहेत. त्या वास्तूमधून कला, संस्कृती, परंपरा जपणारे विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे नवी मुंबई हे देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे केंद्र असल्याचे गौरवोद्गार राज्याचे विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी काढले.
नवी मुंबई फेस्ट-२०२३ हा महाराष्ट्रातील पहिला २९ राज्यांचा सहभाग असणारा राष्ट्रीय महोत्सव २१ ते २९ जानेवारी या कालावधीत होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.नार्वेकर यांच्या हस्ते सीबीडी-बेलापूर येथील दि पार्क हॉटेलमध्ये करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, ठाकरे गटाचे नेते विठ्ठल मोरे, आर.के.म्हापत्रा, दिलीप घाटोले, ललित पाठक, संजय मिश्रा, शहनवार हुसेन, गौतम चक्रवती, कैलास उदयचंद आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई सारख्या विकसीत शहरात अशा प्रकारचे फेस्टीवल आयोजन करुन शहराचे आकर्षण वाढविण्याचे काम केले जात आहे, ही कौतुकाची बाब असून आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच; अशा शब्दात नार्वेकर यांनी महोत्सवाचे कौतुक केले. या महोत्सवाच्या प्रारंभी देशातील विविध राज्यातून आलेल्या सदस्यांनी आपल्या राज्यातील बोली भाषेतून सर्वांचे स्वागत करत प्रथमच होत असलेल्या महोत्सवामुळे भारताची एकात्मता जपली जाईल असा विश्वास व्यक्त केला.

महापालिका मुख्यालयाच्या वास्तूचे कौतुक
नवी मुंबई शहराने कला, संस्कृती जपत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या प्रमाणे शहराला लाभलेल्या वास्तू पैकी एक महत्वपुर्ण अशा नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक वास्तूचे विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.नार्वेकर यांनी भरभरुन कौतुक केले. एकप्रकारे विधीमंडळासारखी ही वास्तू असल्याचे सांगत अशा या भव्यदिव्य वास्तूच्या जडणघडणीत मेहनत घेणार्‍या राजकीय नेत्यांसह सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
====

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -