घरनवी मुंबईपालिकेच्या चित्रकला, किल्ले स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

पालिकेच्या चित्रकला, किल्ले स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

Subscribe

स्वच्छ सर्वेक्षण-2023 उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद

नवी मुंबई-: ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने विविध उल्लेखनीय उपक्रम राबवले असून यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला आहे. ( Navi Mumbai Municipal Corporation under ‘Swachh Survekshan 2023’ various notable activities) त्यामुळे स्वच्छ शहराचे देशात द्वितीय क्रमांकाचे मानांकन नवी मुंबईला लाभले आहे. ’इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत राबविलेल्या ३ अभिनव उपक्रमांची ’बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद झाली आहे. यामधील एक विशेष उल्लेखनीय उपक्रम म्हणजे संपुर्ण नवी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या स्वच्छता विषयक संकल्पनांना मुक्त वाव देणारी ’स्वच्छ चित्रकला स्पर्धा’ या उपक्रमामध्ये २०० हून अधिक शाळांमधील पहिली ते दहावीच्या वर्गातील २ लाख ८३ हजार १४४ मुले सहभागी झाली होती. या सहभागी प्रचंड विद्यार्थी संख्येची नोंद ’बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये घेण्यात आली आहे.

या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयातील ’संकल्प स्वच्छतेचा’ या कार्यक्रमात गौरविण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त शरद पवार, उपायुक्त डॉ.बाबासाहेब राजळे, परिमंडळ १ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२ चे उपायुक्त डॉ.श्रीराम पवार, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, भांडार विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षकांनीही आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.

  • सर्वोत्तम चित्रकारांचा लॅपटॉप देऊन सन्मान
    इयत्तेनुसार ३ गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्वच्छ चित्रकला स्पर्धेमध्ये सर्व गटातून सर्वोत्तम चित्रकार म्हणून नमुंमपा शाळा क्रमांक १५, शिरवणे येथील विद्यार्थी विवेक विलास संगा आणि विद्याभवन हायस्कुल, नेरूळ येथील विद्यार्थी साई नेताजी शिंदे यांना लॅपटॉप देऊन सन्मानीत करण्यात आले. विशेष म्हणजे हे लॅपटॉप रि-टेक या संस्थेमार्फत विविध संगणकीय भाग कौशल्यपूर्णरित्या एकत्रित करून तयार करण्यात आले आहेत. या संस्थेचे संचालक पंकज तिरमनवार यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
  • पहिली ते चौथीच्या गटातील विजेते
    इयत्ता पहिली ते चौथीच्या गटात फादर अ‍ॅग्नेल मल्टीपर्पज स्कूल, वाशी येथील विद्यार्थिनी सान्वी सुरेश सुतार हिने प्रथम क्रमांक पटकाविला तसेच नमुंमपा शाळा क्रमांक ९१, दिवा येथील विद्यार्थी प्रथम प्रसाद साटम याने द्वितीय व तेरणा विद्यालय नेरूळ येथील विद्यार्थी तनुष नरेंद्र मेजोर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.
  • पाचवी ते आठवीच्या गटातील विजेते
    इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटात डीएव्ही पब्लिक स्कूल, नेरूळ येथील विद्यार्थिनी प्राजक्ता सरकार प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, तसेच रॉयल ख्रिश्चन स्कुल, वाशी येथील विद्यार्थी स्वराज्य स्वपन जाना याने द्वितीय क्रमांक व पोदार इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ येथील विद्यार्थी अमेय निळकंठ बोरसे याने तृतीय क्रमांक पटकाविला.
  • नववी व दहावीच्या गटातील विजेते
    इयत्ता नववी व दहावीच्या गटात विद्याभवन हायस्कूल, नेरूळ येथील विद्यार्थी अंकित अमेय धारा याने प्रथम क्रमांकाचे तसेच शिरवणे विद्यालय, नेरूळ येथील विद्यार्थी मंथन शाम भोईर याने द्वितीय आणि न्यू बॉम्बे सिटी स्कूल, नेरूळ येथील तनिष्क सुभाष सुळे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले.
  • किल्ले स्पर्धेतील विजेते
    दीपावलीत घेण्यात आलेल्या ’किल्ला स्पर्धा’ यामध्ये सेक्टर ८, नेरूळ येथील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये वैभव निकारे आणि सहकार्‍यांनी बनवलेल्या किल्ल्याला प्रथम व सेक्टर ८, नेरूळ येथील गुरुकृपा सोसायटीमध्ये तनिष रवींद्र शिर्के आणि सहकार्‍यांनी बनवलेल्या किल्ल्याला द्वितीय पारितोषिकाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे सध्याच्या सोशल मिडीयाप्रेमी डिजिटल युगात सदर किल्ले स्पर्धेचे गुणांकन सोशल मीडियावर किल्ल्याची छायाचित्रे अपलोड करून त्यावर मिळालेल्या लाईक्सची मोजणी करून देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या किल्ल्यास १०५८ आणि द्वितीय क्रमांकाच्या किल्ल्यास ७१६ लाईक्स प्राप्त झाले होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -