घरनवी मुंबईNavimumbai : उबाठाला झटका; माजी नगरसेवक एम.के.मढवींना खंडणी प्रकरणी अटक

Navimumbai : उबाठाला झटका; माजी नगरसेवक एम.के.मढवींना खंडणी प्रकरणी अटक

Subscribe

नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या समर्थक म्हणून ओळखले जाणारे ऐरोलीतील माजी नगरसेवक एम.के.मढवी यांना शनिवारी रात्री उशिरा खंडणी प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. मढवी यांच्याबरोबरच त्यांचा ड्रायव्हर अनिल मोरे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोबानगर येथील लाईट टेलिकॉम या कंपनीला ऐरोली परिसरात खोदकाम करून इंटरनेट केबल टाकण्याचे काम  देण्यात आले होते. या कंपनीमार्फत ऐरोली परिसरात खोदकाम सुरू असताना माजी नगरसेवक मढवी यांनी कंपनीचे सदस्य (ठेकेदार) त्रिभुवन सिंग यांच्याकडे मढवी आपण येथील स्थानिक नगरसेवक असून अडीच लाख रुपये द्या आणि मगच काम करा, अन्यथा काम बंद पाडू, अशी धमकी फोनवरून तसेच ऑफिसमध्ये बोलावून दिली होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या कंपनीच्या ठेकेदाराने याबाबत खंडणी विरोधी पथक ठाणे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. अडीच लाखाच्या रकमेपैकी दीड लाख रुपये मढवी  घेत असताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे देण्यात आली होती. खंडणी विरोधी पथकाने दाखल केलेल्या पुराव्यानुसार काल शनिवार तक्रारदाराकडून पैसे घेत असताना मढवी यांचा ड्रायव्हर अनिल मोरे यांच्या माध्यमातून लाच घेतली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा…Aaditya Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

दोन्ही आरोपी यांच्या विरोधात कळवा पोलिस ठाणे येथे भा दं.वि.कायदा कलम ३८४, ३८५, ३८७, ५०६, ५०६(२), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.या प्रकरणाचा अधिक तपास खंडणी विरोधी पथक,गुन्हे शाखा, ठाणे करीत आहेत.

- Advertisement -

ऐरोलीमध्ये याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मढवी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली तर रबाले पोलीस ठाण्या बाहेर कार्यकर्त्याचा जथा जमला. शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुख, कार्यकर्त्यांनी ऐरोलीमध्ये गर्दी केली आहे. राजकीय सुडातून हे कारवाई करण्यात येत असल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -