घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha Election 2024 : देशाच्या राजकारणातील आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग...

Lok Sabha Election 2024 : देशाच्या राजकारणातील आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग – उद्धव ठाकरे

Subscribe

आयपीएलप्रमाणे भारताच्या राजकारणात झालं आहे. आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग, असं झालं आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात झालेल्या सभेत भाष्य केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : आयपीएलप्रमाणे भारताच्या राजकारणात झालं आहे. आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग, असं झालं आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात झालेल्या सभेत भाष्य केले. तसेच, कोकणात मला प्रचाराची गरज नसल्याचे वक्तव्य केले. कारण कोकण हे शिवसेनेचे आणि ठाकरे कुटुंबियांचे हृदय आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde In Konkan vvp96)

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेतील भाषणाच्या सुरूवातीला उद्धव ठाकरेंनी कोकणात मला प्रचाराची गरज नसल्याचे वक्तव्य केले. कारण कोकण हे शिवसेनेचे आणि ठाकरे कुटुंबियांचे हृदय आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

“कोकणातील विनायक राऊत, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासह तुम्ही सगळे शिवसेना फोडण्याच्या प्रयत्नानंतरही जागच्या जागी उभे आहात. हा डाव म्हणजे, शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दारांकडे धनुष्यबाण दिले, गद्दारांच्या जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि तुम्ही इतकेवर्ष जपलेला धनुष्यबाण कोकणातून गायब केला. म्हणजेच काय तर, हे त्यांना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) कळलंच नाही, की दिल्लीतील बसलेले दोन मालक शिवसेनेचे कोकणाबरोबर असलेलं नात तोडायला निघाले आहेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

“त्यांना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) अजूनही माहित नाही की, कोकणात जांभा दगड आहे आणि असं म्हणतात की, जांभा दगड एकेकाळी लावारस होता. याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा होणार नाही. संपूर्ण कोकणासह महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात लावारस उफळूनवर आला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींना सूरच लागत नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

- Advertisement -

आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग – उद्धव ठाकरे

“सध्या आयपीएलचे दिवस सुरू आहेत. सामना बघताचा कळत नाही की, हा खेळाडू आपल्या टीममध्ये होता. पण आता तो तिकडे गेला. त्यानंतर तो इकडे होता पण आता तिकडे गेला. त्या आयपीएलप्रमाणे भारताच्या राजकारणात झालं आहे. आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग, असं झालं आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

एक अकेला आजूबाजूला सगळे भ्रष्टाचारी – उद्धव ठाकरे

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आता कितीही बोलत असतील पण त्यांचा 2014 आणि 2019 सालचा आत्मविश्वास दिसत नाही. 2019 साली सुरूवातीला आपण फसलो होतो. त्यावेळी पंतप्रधानांचे एक अकेला सब पे भारी असं होतं. पण आता एक अकेला आजूबाजूला सगळे भ्रष्टाचारी असे आहे. हे असे असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांचा आत्मा वरून रडत असेल. अटलजी म्हणाले होती की, मला मिळत असेल तर मी ते चिमटीत पकडणार नाही. पण आता कोणाच्या हातात भाजप गेला आणि त्याने होता-नव्हता तो सगळा भाजप संपवला, असे त्यांना वाटत असेल. शिवसेना जेव्हा तुमच्या सोबत होती. त्यावेळी मोदी-शहा यांना महाराष्ट्रात किती सभा घ्यायला लागत होत्या. त्यावेळी शिवसेनासोबत होती. अबकी बार भाजप तडीपार करा”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंना केला.

“त्यांनी (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना आणि धनुष्यबाण चोरलं. पण विनायक राऊत, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासह सर्व शिवसैनिकांचा मला अभिमान आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Aaditya Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -