घरनवी मुंबईThackeray Group : मराठी कर्मचार्‍यांना कामावरून काढले; ठाकरे गटाची मॅरियट हॉटेलवर धडक

Thackeray Group : मराठी कर्मचार्‍यांना कामावरून काढले; ठाकरे गटाची मॅरियट हॉटेलवर धडक

Subscribe

मेरियट हॉटेलमध्ये काम करणार्‍या मराठी कर्मचार्‍यांना कामावरून अचानक कमी केले. या प्रकाराची भारतीय कामगार सेनेच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली. कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी आज मेरियट हॉटेलवर धडक दिली आणि व्यवस्थापनाला घेराव घातला.

नवी मुंबई : मराठी कर्मचार्‍यांना कामावरून अचानक कमी केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज 15 फेब्रुवारी रोजी तुर्भे एमआयडीसीमधील मॅरियट हॉटेलवर धडक देण्यात आली. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे मॅरियट हॉटेलचे उर्मट व्यवस्थापन सुतासारखे सरळ झाले. कामावरून कमी केलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. (Thackeray Group Marathi employees sacked The Thackeray group attacked the Marriott Hotel)

मॅरियट हॉटेलमध्ये काम करणार्‍या मराठी कर्मचार्‍यांना कामावरून अचानक कमी केले. या प्रकाराची भारतीय कामगार सेनेच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली. कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, सरचिटणीस सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी आज मॅरियट हॉटेलवर धडक दिली आणि व्यवस्थापनाला घेराव घातला. ज्या मराठी कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले आहे, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आश्वासन हॉटेलच्या व्यवस्थापनाने दिले.

- Advertisement -

मनुष्यबळ पुरवणारा ठेकेदार बदलल्यामुळे या कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले होते. मात्र यापुढे ठेकेदार जरी बदलला तरी या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करू नये, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. या आंदोलनामध्ये शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, शहरप्रमुख काशिनाथ पवार, उपशहरप्रमुख प्रकाश चिकणे, महेश कोटीवाले, विभागप्रमुख बाळकृष्ण खोपडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

हेही वाचा : Himalaya Bridge : हिमालय पुलाची एस्कलेटर सेवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून

- Advertisement -

अन्याय करू नका

ठेकेदार बदलल्यामुळे कर्मचार्‍यांना कामावरून कमी करणे हे फार दुर्दैवी आहे. हॉटेल व्यवस्थापनाने या पद्धतीने कोणत्याही कर्मचार्‍यावर अन्याय करू नये. ज्या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले आहे, त्यांना तातडीने पुन्हा कामावर घेण्यात यावे. कोणत्याही कर्मचार्‍यावर अन्याय झाला तर शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप राऊत यांनी हॉटेलच्या व्यवस्थापनाला दिला.

हेही वाचा : Chakankar On Sule: मांसाहार करून मंदिरात पाया पडणाऱ्यांना…; चाकणकरांचा सुळेंवर हल्लाबोल

कर्मचार्‍यांनी मानले आभार

हॉटेल व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने कामावरून कमी केल्यानंतर या कर्मचार्‍यांपुढे अनेक अडचणी उभा राहिल्या होत्या. मात्र त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना धावून आली. शिवसेनेने दणका दिल्यानंतर हॉटेलचे प्रशासन वठणीवर आले. शिवसेनेने खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्यामुळे या कर्मचार्‍यांनी विशेष आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -