घरपालघरदीड वर्षांनतर आदिवासी आश्रमशाळेची घंटा वाजली

दीड वर्षांनतर आदिवासी आश्रमशाळेची घंटा वाजली

Subscribe

कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून पालघर जिल्ह्याच्या आदिवासी तालुक्यातील सरकारी आश्रमशाळेत, दीड वर्षाच्या कालावधीनंतर पहिली घंटा वाजली आहे.

कोरोनामुळे सारेच जग स्तब्ध झाले होते. ते काही अंशी पुर्वपदावर येत आहे. शासनाने दीड वर्षानंतर शाळा आणि निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून पालघर जिल्ह्याच्या आदिवासी तालुक्यातील सरकारी आश्रमशाळेत, दीड वर्षाच्या कालावधीनंतर पहिली घंटा वाजली आहे. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना हा वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला आहे.

दीड वर्षाच्या लॉकडाऊन काळात आदिवासी भागात बालविवाह, बालमजुरी या अनिष्ट घटना विद्यार्थी जीवनात घडत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने, जनजीवन पुर्वपदावर येत असतांना, शासनाने निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. २ ऑगस्टपासून आदिवासी भागातील निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचा आदेश आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले आहेत. आश्रमशाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. पालकांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शाळेचे वेळापत्रक व भोजनाचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर ठेवणे, संशयित अथवा कोरोनाबाधीत विद्यार्थ्यांची योग्य दक्षता घेणे, तसेच विद्यार्थ्यांचे समुदेशनाची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधिक्षक, आणि गृहपाल यांनी घ्यावी असे शासनाने आदेश दिले आहेत.

- Advertisement -

या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यातील  ३० पैकी  १७  आश्रमशाळेत  ८ वी ते  १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करून, दिड वर्षाच्या कालावधीनंतर निवासी आश्रमशाळेत घंटा वाजली आहे. शाळेच्या  पहिल्याच दिवशी या १७ आश्रमशाळेत  १  हजार  २९२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. तर ऊर्वरित  १७ आश्रमशाळा, ग्रामपंचायतीने अहवाल न दिल्याने आणि कोविड रूग्ण त्या भागात असल्याने सुरू करण्यात आल्या नसल्याची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोनवणे यांनी दिली आहे.

सुरू झालेल्या सरकारी आश्रमशाळा

- Advertisement -

विनवळ, नांदगाव, देहेरे, झाप, न्याहाळे, दाभेरी, दाभोसा, वांगणी, ओझर, हिरवे, गोंदे, पळसुंडे, घाणवळ, भोपोली, कर्हे, कावळे, गुहीर

सुरू न झालेल्या आश्रमशाळा

साकुर, ऐना, सुर्यमाळ, कारेगांव, चास, मुरबाड, साखरे, कुर्झे, पाली, बुधावली, गारगाव, आमगाव, कळंभे

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -