घरपालघरभाजपने केली आदिवासी बांधवांची दिवाळी गोड

भाजपने केली आदिवासी बांधवांची दिवाळी गोड

Subscribe

या आधी सुर्यमाळ येथील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले होते. तालुक्यातील तब्बल १००० आदिवासी कुटुंबांना आपण समाजाचे देणेे लागतो या भावनेतून प्रत्येक वर्षी दिवाळीचे फराळ संतोष चोथे हे वाटप करत आहेत.

मोखाडा : भारतीय जनता पक्ष मोखाडाच्या वतीने व भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांच्यामार्फत २६ ऑक्टोबर रोजी मोखाडा तालुक्यातील घोडीचा पाडा आणि धारेचा पाडा येथील २५० आदिवासी कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले व त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. या आधी सुर्यमाळ येथील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले होते. तालुक्यातील तब्बल १००० आदिवासी कुटुंबांना आपण समाजाचे देणेे लागतो या भावनेतून प्रत्येक वर्षी दिवाळीचे फराळ संतोष चोथे हे वाटप करत आहेत. नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संतोष चोथे यांचे व सहकार्‍यांचे तेथील ग्रामस्थांनी तारपा नाच व आदिवासी नृत्य करून स्वागत केलेे आणि संतोष चोथे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैअशा घोषणा देखील यावेळी ग्रामस्थांनी
दिल्या.

यावेळी बोलताना चोथे यांनी आपल्या सुख दुःखात भाजप नेहमी आपल्या सोबत असेल व पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागाचा विकास करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले व दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या. भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी त्या प्रसंगी बोलताना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असून ८०% समाजकारण व २०% राजकारण करून आपल्या अडीअडचणी सोडवण्यास आम्ही तत्पर असू असे सांगितले. या प्रसंगी भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील , भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे साहेब, तालुका सरचिटणीस विलास पाटील, भा. ज. यु. मो. तालुका अध्यक्ष प्रतीक पाघारे , भा. ज. यु. मो. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष दिशांत पाटील, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष किशोर भवारी, भूषण फाळके, हेमंत वझे ग्रामस्थ, भाजप पदाधिकारी उपस्थित
होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -