घरपालघरपालघर रेल्वे स्टेशनची लिफ्ट तीन दिवसांपासून बंद

पालघर रेल्वे स्टेशनची लिफ्ट तीन दिवसांपासून बंद

Subscribe

मात्र फलाट क्रमांक दोन वर लिफ्ट नसल्याने प्रवाशांना फलाट क्रमांक एकवर यायचे झाल्यास फार त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पूल ही उंच असल्याने वयोवृद्धांना रुग्णांना हा पादचारी पूल चढताना फारच त्रास सहन करावा लागत आहे.

पालघर : पालघर रेल्वे स्थानकावरील असलेल्या फलाट क्रमांक एक हा एकमेव लिफ्टची सुविधा असणारा फलाट असून येथील लिफ्ट गेल्या तीन दिवसापांसून बंद आहे. यामुळे वयोवृद्ध व रुग्ण प्रवाशांना फलाट क्रमांक दोन गाठण्यासाठी 40 ते 50 पायर्‍या चढाव्या लागत असून यामुळे पालघर येथील वयोवृद्ध नागरिक, गरोदर महिला यांची कुचंबणा होत आहे. या महत्त्वाच्या समस्येकडे रेल्वे प्रशासन लक्ष देईल का ?असा संतप्त प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
पालघर रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट गेल्या दहा ते बारा दिवसात दुसर्‍यांदा बंद पडली आहे. आता ती गेल्या तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे .त्याच फलाटावर रेल्वे अधिकार्‍यांचे कार्यालय सुद्धा आहे. मात्र अधिकारी वर्ग सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. फलाट क्रमांक एकवर लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र फलाट क्रमांक दोन वर लिफ्ट नसल्याने प्रवाशांना फलाट क्रमांक एकवर यायचे झाल्यास फार त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पूल ही उंच असल्याने वयोवृद्धांना रुग्णांना हा पादचारी पूल चढताना फारच त्रास सहन करावा लागत आहे.

लिफ्ट बंद असल्याची तक्रार करण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्टेशन कार्यालय गाठल्यावर कार्यालय बंद असल्याचे उत्तर त्यांना देण्यात आले. तक्रार नोंदवही उपलब्ध होत नसल्याने तक्रार नेमकी कुठे? करायची असा प्रश्न रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत. रेल्वे सल्लागार समितीवर पालघरमधील दोन ते तीन लोकांची वर्णी लागलेली असताना तेही यासाठी काही करत नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. वयोवृद्धांना होणार्‍या त्रासापासून सुटका करण्यासाठी या सल्लागार समितीच्या पदाधिकार्‍याने तरी लक्ष घालून हा कायमचा होणारा त्रास दूर करावा अशी ही मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

3 दिवसांपूर्वीच लिफ्ट बंद झाल्याची तक्रार मिळताच इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या कर्मचार्‍यांना पाठवले होते. परंतु लिफ्टमधील खराब झालेले उपकरण बदलण्यासाठी नवीन उपकरण उपलब्ध नसल्याने सध्या लिफ्ट बंद आहे. याबाबत संबंधित विभागाकडे कळविण्यात आले आहे.
– मुकेश कुमार,
प्रबंधक- पालघर रेल्वे स्थानक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -