घरपालघरबँक स्थलांतर होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर

बँक स्थलांतर होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर

Subscribe

मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सायवन व परिसरातील गावांच्या ग्रामस्थांकडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापना विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू असून जर स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर हा मोर्चा नक्कीच काढण्यात येईल, असे सायवन ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

पालघर : डहाणू पूर्वेला सायवन येथे असलेली एकमेव बँक ’बँक ऑफ महाराष्ट्र’ ही बँक सायवनपासून स्थलांतरित करून चारोटी या ठिकाणी नेली जाणार आहे. त्यामुळे सायवन व सायवनच्या परिसरातील आष्टा, रायपूर, बेंडगाव, शिलोंडा, रामपूर, व्याहाळी, दिवशी, दाभाडी, गडचिंचले, किन्हवली, सुखडआंबा, चळणी, नरोली, सायवन, बांधघर, गांगोडी, निंबापूर व बापुगांव इत्यादी गावातील खातेधारकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जाव लागणार आहे. त्यामुळे सायवन व परिसरातील गावांच्या नागरिकांकडून बँक स्थलांतराविरोधात कडाडून विरोध केला जात आहे. मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सायवन व परिसरातील गावांच्या ग्रामस्थांकडून बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापना विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू असून जर स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर हा मोर्चा नक्कीच काढण्यात येईल, असे सायवन ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत दर्जा असलेली बँक असल्याने अनेक सरकारी योजनांचा व्यवहार याच बँकेच्या माध्यमातून होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सायवन या बँकेत अनेक शाळकरी मुलांची खाती देखील आहेत. शाळेच्या वेळेत पैसे काढताना त्यांची गैरसोय होईल. कारण मुलांना शनिवारी दुपारून व रविवारी सुट्टी असल्याने नेमके त्याच दिवशी बँक बंद असते. इतर दिवशी शाळा ते सायवनपासून चारोटी या ठिकाणी कसे जातील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बँकेत अनेक वृद्धाची (वयोवृद्ध) नागरिकांची खाते आहेत. याच बँकेत खाते असलेल्या वृद्ध नागरिकांना पेन्शन मिळते ते सुद्धा एक हजाराच्या असते, ते काढण्यासाठी तब्बल 20 ते 30 किलोमीटर चा प्रवास करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -