घरपालघरपाकच्या ताब्यात असलेल्या खलाशांच्या कुटुंबांना पोलिसांची दिवाळी निमित्त मदत

पाकच्या ताब्यात असलेल्या खलाशांच्या कुटुंबांना पोलिसांची दिवाळी निमित्त मदत

Subscribe

त्यांच्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस कर्मचार्‍यांनी या खलाशांच्या कुटुंबियांची भेट घेत, त्यांना फराळ-मिठाई आणि भेटवस्तू दिल्या.

डहाणू : बोर्डीनजीकच्या अस्वाली आणि जांबूगाव येथील खलाशी पाकिस्तानच्या कारागृहात कैदेत आहेत. या खलाशांच्या कुटुंबियांना दिवाळी सणाच्या औचित्यावर घोलवड पोलिसांनी मिठाई, भेटवस्तू आणि शुभेच्छा दिल्या. या कुटुंबियांना अडचणीच्या काळात मदत करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. दरम्यान परराज्यातील मासेमारी बंदरावर जाताना पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी केले. पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटीकडून 27 सप्टेंबरला समुद्रात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून नवश्या महाद्या भिमरा(वय, 31, राहणार राऊतपाडा), सरीत सोन्या उंबरसाडा(वय , राऊतपाडा), कृष्णा रामज बुजड(वय 18, राऊतपाडा), विजय मोहन नगवासी(वय 30, खुनवडे, गोरातपाडा) विनोद लक्ष्मण कोल(वय 53, खुनवडे-गोरातपाडा) तसेच जयराम जान्या सालकर(वय, 35, भिनारी, रायातपाडा) आणि उधर्‍या रमण पाडवी(वय 25, रा. सोगवे डोंगरीपाडा) यांना पकडले. या घटनेला महिन्याभराचा अवधी लोटला असून दिवाळीच्या सणात ही कुटुंबे दुःखात आहेत. त्यांच्या दुःखाचा भार हलका करण्यासाठी घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस कर्मचार्‍यांनी या खलाशांच्या कुटुंबियांची भेट घेत, त्यांना फराळ-मिठाई आणि भेटवस्तू दिल्या.

पालघर पोलीस विभागाकडून ’जनसंवाद अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या अनुषंगाने आदिवासी पाड्यावर जाऊन या खलाशांच्या कुटुंबियांची पोलिसांनी भेट घेतली. यावेळी जांबुगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोकुळ धोडी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दिवाळीनिमित्त आदिवासी समाजात कुल व ग्रामदैवतांची पूजा कुटुंब प्रमुखांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने केली जाते. नवीन धान्याचा नैवेद्य दैवताला अर्पण केला जातो. नातेवाईक, आप्तेष्ट तारपानृत्य करून जल्लोषात सण साजरा करतात. मात्र या पीडित कुटुंबांचे घरधनी पाक कैदेत असल्याने ऐन उत्सवात दुखवटा आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -