घरपालघरएकनाथ शिंदेंचा पक्ष संघटना एकदम ‘ओक्के’ करण्यावर भर

एकनाथ शिंदेंचा पक्ष संघटना एकदम ‘ओक्के’ करण्यावर भर

Subscribe

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती व बहुजन विकास आघाडीतील महत्त्वपूर्ण पदाधिकारी असलेले सुदेश चौधरी यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.

पालघर : ग्रामपंचायत निवडणुकींचे बिगुल वाजले असून पालघर जिल्ह्यात शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. वसई तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश तेंडोलकर तर तालुकाप्रमुखपदी सुदेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर, वसई, नालासोपारा विधानसभा व बोईसर विधानसभा क्षेत्रातील वसई तालुका हा भाग निलेश तेंडोलकर यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. त्यांची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीकरता करण्यात आलेली आहे. तेंडोलकर गेली तीस वर्षे वसई तालुक्यात शिवसेनेत सक्रीय आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती व बहुजन विकास आघाडीतील महत्त्वपूर्ण पदाधिकारी असलेले सुदेश चौधरी यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बोईसर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलम संखे आणि माजी पंचायत समिती सदस्य व बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. निलम संखे यांची शिंदे गटाच्या पालघर उपजिल्हाप्रमुख तर मुकेश पाटील यांची बोईसर शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रमगड तालुकाप्रमुखपदी सागर आळशी तसेच रिकी रत्नाकर यांची पालघर युवासेनेच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. यावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम आणि माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ उपस्थित होते.

- Advertisement -

अमोल पाटील मोखाडा तालुकाप्रमुख
शिंदे गटात सामिल झालेल्या मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांची मोखाडा तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायती निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाकडून पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या जात असून त्यात नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्या खांद्यावर तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष अमोल पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात. मोखाडा नगरपंचायतीच्या मागील दोन निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच लढल्या गेल्या. दोन्ही वेळेस शिवसेनेला येथे वर्चस्व सिद्ध करण्यात यश आले आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवणार असून होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -