घरपालघरमानवनिर्मित वनव्यांमध्ये जंगलातील चारा जळून खाक

मानवनिर्मित वनव्यांमध्ये जंगलातील चारा जळून खाक

Subscribe

त्यामुळे धरणाचे पाणी येथे पोहचू शकले नाही.चांगले पर्जन्यमान असूनही पावसाचे पाणी डोंगर दर्‍यांमधून नदी मार्गे आले तसे वाहून जाते.

मनोर: पालघर जिल्ह्यात मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली असतानाच जंगलातील मानव निर्मित वनव्यांमुळे जंगलाचा मोठा भाग जळून खाक झाला आहे.नवीन झुडपांसह चारा जळाल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जंगलात मोफत उपलब्ध असणार्‍या चार्‍याअभावी जनावरांची उपासमार होणार आहे.जनावरांसाठी चारा खरेदी करावा लागणार असल्याने पशु पालक शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.पालघर जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस होतो. परंतु पालघरच्या पूर्वेकडील भाग डोंगराळ भाग असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झटपट होऊन पाणी नदी मार्गे वाहून जाते.मार्च महिन्याच्या सुरुवातीला जव्हार मोखाडा भागात पाणी टंचाई जाणवू लागते. सुर्या प्रकल्पांतर्गत पालघर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी कालव्यांची कामे अपूर्ण आहेत.त्यामुळे धरणाचे पाणी येथे पोहचू शकले नाही.चांगले पर्जन्यमान असूनही पावसाचे पाणी डोंगर दर्‍यांमधून नदी मार्गे आले तसे वाहून जाते.

त्यामुळे रब्बी हंगामात शेतीला काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते.परंतु उन्हाळ्यात पालघर तालुक्यातील पूर्वेकडील काही गावांमध्ये मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.पावसाचे पाणी अडवण्यासाठी डोंगरातून वाहणार्‍या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात छोटे मोठे बंधारे बांधण्यात आले आहेत.परंतु या बंधार्‍यांमध्ये गाळ साचल्याने जास्त काळ पाणी साठून राहत नाही,त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बंधारे कोरडे पडतात. चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधन सांभाळणे अवघड होत आहे.महागडा चारा खरेदी करावा लागत असूनही चारा उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी पशुधन बाळगणे बंद केले आहे. अशात चारा उपलब्ध नसल्याने पशुधन सांभाळण्यासाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात आदिवासी शेतकरी पशुधन बाळगून आहेत.आदिवासी शेतकर्‍यांच्या जमिनी जंगल क्षेत्रात असल्याने जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करता येत नसल्याने पशुधन सांभाळणे गरजेचे ठरते.पाळीव जनावरांना चरण्यासाठी जंगलात सोडले जाते.भूमिहीन शेतकर्‍यांनी जंगलात मोठ्या प्रमाणात शेती करणे सुरू केल्याने चराऊ क्षेत्र कमी झाले आहे.

- Advertisement -

 

पालघर जिल्ह्यात 3 लाख 8 हजार 637 पशुधन आहे.पावसाळी पर्जन्यमाना नुसार जिल्ह्यात पाणी टंचाई नाही.शेतकर्‍यांनी चार्‍याचे नियोजन केले पाहिजे. शेतकर्‍यांकडून मागणी आल्यास जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार चारा उपलब्ध करून दिला जाईल.
डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -