घरपालघरउत्तन डम्पिंग ग्राउंडला पुन्हा भीषण आग

उत्तन डम्पिंग ग्राउंडला पुन्हा भीषण आग

Subscribe

या आगीमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत असून स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेच्या उत्तन डम्पिंग ग्राउंडला शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे उत्तन सह समुद्र किनारी परिसरात सगळीकडे धूर पसरला आहे. गेल्या आठवड्यात देखील आग लागली होती. डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. या आगीमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत असून स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

मीरा- भाईंदर महापालिकेने भाईंदर पश्चिमेला २००८ मध्ये उत्तन डम्पिंग ग्राउंड सुरू केले आहे. या डम्पिंग ग्राउंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून लाखो टन कचरा विना प्रक्रिया पडून आहे. त्यातून मिथेन गॅस बाहेर निघून आग लागल्याच्या घटना अनेक वेळा घडत आहेत. गेल्या आठवड्यात देखील आग लागली होती. चार तास अथक परिश्रम करून अग्निशमन विभागाने आग विझवली होती. शनिवारी दुपारी पुन्हा आग लागली. या आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे बंब व टँकर आणि जवान आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आले .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -