घरपालघरMokhada Railway: मोखाड्याच्या रेल्वे मार्गाची गॅरन्टी घेणार कोण ?

Mokhada Railway: मोखाड्याच्या रेल्वे मार्गाची गॅरन्टी घेणार कोण ?

Subscribe

खासदार राजेंद्र गावित आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे .

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागाचा विकास व्हावा यासाठी ,गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू ,जव्हार ,मोखाडा ,नाशिक या रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने करण्यात आली आहे .परंतु या प्रश्नाकडे सत्ताधार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. लोकसभेची निवडणूक आली की ? जव्हार- मोखाडा रेल्वे मार्गाची चर्चा सुरु होते .रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल याबाबत सत्ताधारी पक्षाकडून तुणतूनही वाजवले जाते ?परंतु निवडणुकांनंतर परिस्थिती मात्र जैसे थेच. यामुळे वर्षानुवर्षे रेल्वेचा प्रश्न खितपत पडला आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागाच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे मागणी होत असलेल्या डहाणू-जव्हार-नाशिक रेल्वेमार्गा ऐवजी उमरोली-विक्रमगड-जव्हार-इगतपुरी हा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्याचा आला आहे. खासदार राजेंद्र गावित आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे .

पालघर जिल्ह्यातील डहाणू,जव्हार,मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हा दुर्गम आदीवासी भाग थेट रेल्वेने जोडण्याची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी सुद्धा या रेल्वेमार्गासाठी अनेक वर्षे प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. मात्र डहाणू-नाशिक दरम्यानच्या या मार्गात धामणी धरण, जव्हार, मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर या दुर्गम तालुक्यांतील लहान-मोठ्या डोंगर-टेकड्या, घाट, नद्या आणि उंच सखल भाग यामुळे हा 167 किमीचा मार्ग बनविण्यासाठी मोठा खर्च येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा मार्ग व्यवहार्य नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्वेमध्ये स्पष्ट झाले होते. त्याऐवजी उमरोली-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा ते इगतपुरी हा 95 किमी अंतराचा आणि कमी खर्चात बनणारा रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु, असे असले तरी आणखीन किती दिवस कागदी घोड्यांमध्ये हा रेल्वेचा प्रश्न गुंतलेला पहावयास मिळणार आहे.

- Advertisement -

रेल्वे मार्ग झाल्यास आदिवासी भागाचा कायापालट ?

उमरोळी ते इगतपुरी प्रस्तावित नवीन रेल्वेमार्ग हा पालघर जिल्ह्याच्या मध्य भागातून जाणारा असल्याने डहाणू ते वसई आणि जव्हार ते वाडा या पालघर जिल्ह्यातील संपूर्ण भागाला सोयीस्कर ठरणार आहे. त्याचप्रमाणे जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड हा पर्यटनदृष्ट्या अतिशय समृद्ध परंतु आधुनिक दळण वळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे दुर्गम असलेल्या या भागातील नागरिकांना पालघर जिल्हा मुख्यालयात कमीत कमी वेळेत पोचणे शक्य होणार आहे.नवीन रेल्वेमार्गामुळे या भागातील विकासाला चालना मिळून नवीन उद्योगधंदे सुरू होऊन स्थलांतराचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्याचप्रमाणे तारापूरसारखी मोठी औद्योगिक वसाहत, बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग हे प्रकल्प एकमेकांशी जोडण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -