घरपालघरविरार येथील निर्माणाधिन बांधकामांतून प्रदूषण

विरार येथील निर्माणाधिन बांधकामांतून प्रदूषण

Subscribe

बहुतांश बांधकाम व्यावसायिक खडी, सिमेंट, वाळू व अन्य लोखंडी साहित्य रस्त्याबाजूला करून ठेवत असल्याने रहदारीत अथडळा तर येतो. पण, प्रदूषण समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे.

वसईः वसई-विरार महापालिका बांधकाम व्यावसायिकांना रितसर परवानगी देत असली तरी संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून काम करताना आवश्यक ती काळजी घेण्यात येत नसल्याने सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. बहुतांश बांधकाम व्यावसायिक खडी, सिमेंट, वाळू व अन्य लोखंडी साहित्य रस्त्याबाजूला करून ठेवत असल्याने रहदारीत अथडळा तर येतो. पण, प्रदूषण समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे.

दिवाळीदरम्यान महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या प्रदूषणानंतर वसई-विरार महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशानंतर शहरातील बहुतांश निर्माणाधिन इमारतींना नोटिसा जारी करून बांधकाम थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या. शिवाय प्रदूषण करणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई केलेली होती. दिवाळी सरताच शहरात पुन्हा एकदा बांधकामांनी वेग घेतलेला आहे. त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाणही प्रचंड वाढलेले आहे. सध्या हिवाळा असल्याने या प्रदूषणाची तीव्रता अधिक आहे. या सगळ्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असताना महापालिकेने मात्र बांधकाम व्यावसायिकांना रान मोकळे करून दिलेले आहे.मागील वर्षी वसई-विरार महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण विभागाने केलेल्या पाहणीत जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत साडेतीन हजारपेक्षा जास्त क्षयरोग रुग्ण आढळलेले होते. याला शहरात वाढलेली धूळ व प्रदूषण हेच कारण असताना प्रदूषण करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांनी महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -