घरपालघरविषय समिती सदस्यांची निवड लांबणीवर

विषय समिती सदस्यांची निवड लांबणीवर

Subscribe

मात्र त्यावर एकमत होऊ न शकल्याने ही बैठक स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पालघर:  जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता जाहिर झाल्याने लांबणीवर पडली आहे. आता ही निवड निवडणुकीनंतर होणार होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती (१४ सदस्य), जलव्यवस्थापन (१२) समिती यांच्यासह शिक्षण, वित्त, आरोग्य, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण अशा १० विषय समितीवर सदस्य निवड होणार आहे. प्रत्येक विषय समित्यांवर किमान 9 ते १० सदस्यांची नेमणूक होत असते. या विषय समितीच्या सभासदांच्या निवडीकरता सभेची नोटीस बजावल्यानंतर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याने विषय समिती निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद नव्याने गठित झाल्यानंतर विषय समितीसाठी निवडणूक होत असते. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा विषय समिती अध्यक्ष यांच्या पदांमध्ये बदल झाल्यानंतर रिक्त होणार्‍या जागांसाठी निवडणूक घेण्याची पद्धत आहे. यंदा मात्र पालघर जिल्हा परिषदेत सत्तापालट झाल्यानंतर ज्या इच्छुकांना समिती सभापतीपद मिळाली नाहीत अशांना महत्त्वाच्या विषय समितीमध्ये सामावून घेण्याचे योजण्यात आले होते. मात्र त्यावर एकमत होऊ न शकल्याने ही बैठक स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याच दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सदस्याला किमान एक तर कमाल दोन समित्यांचे सदस्यत्व मिळणे अपेक्षित असते. पक्षातील सदस्य बळाच्या प्रमाणानुसार विविध समित्यांवर सदस्यांची नेमणूक होते. जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील जिजाऊ संघटनेचा गट व बहुजन विकास आघाडी सत्तेत आहेत. विषय समिती सदस्यांसाठी सर्व पदे नव्याने भरण्याबाबत एकमत न झाल्यास याद्यांप्रमाणे फक्त रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -