घरपालघरदुरुस्तीसाठी ५८ कोटी खर्चूनही रस्त्यात खड्डे

दुरुस्तीसाठी ५८ कोटी खर्चूनही रस्त्यात खड्डे

Subscribe

२०२१ ते आतापर्यंत या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ५८ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असून तीन महिन्यापूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र, सध्या या महामार्गाची अवस्था जैसे तेच पाहायला मिळते.

वाडा: मनोर-वाडा-भिवंडी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५८ कोटी रुपये खर्च करून देखील आजही या मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने आक्रमक झालेल्या स्थानिकांनी कुडूस येथे हा महामार्ग रोखून धरला. महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असून याचा मोठा त्रास येथील स्थानिक नागरिक आणि वाहन -चालक यांना सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात घडत असून यामुळे अनेक स्थानिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीचे काम करणार्‍या ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. मनोर -वाडा- भिवंडी हा महामार्ग मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी महामार्ग म्हणून समजला जातो. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाची दयनीय अवस्था झाली होती. २०२१ ते आतापर्यंत या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ५८ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असून तीन महिन्यापूर्वी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र, सध्या या महामार्गाची अवस्था जैसे तेच पाहायला मिळते.

या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेने अनेक आंदोलन केली होती. त्यानंतर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम याच संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. मे महिन्याच्या अखेरीस या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र, तीन महिन्यांतच हा महामार्ग पुन्हा खड्डेमय झाला असून खड्ड्यांमुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गममावा लागला आहे. तर अनेक प्रवासी आणि वाहन चालकांना कायमचे अपंगत्वही आले आहे. वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची लागेबंदी असल्याने हा महामार्ग खड्डेमय झाल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

000

ज्या नेत्यांनी आंदोलन केले त्याच नेत्याला या महामार्गाच्या दुरुस्तीच्या ठेका देण्यात आला होता. ५८ कोटी खर्च करूनही पुन्हा या महामार्गाची दुरवस्था झाली असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादी टाकून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.

- Advertisement -

—जितेश पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

०००

हा रस्ता सुप्रीम कंपनीने बनवला होता. मूळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यातून खड्डे पडत आहेत. पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रमाण वाढलेले नाही. जिजाऊसह इतरही ठेकेदारांनी रस्ता दुरुस्तीचे काम केले होते. पण, आंदोलनाच्या नावाखाली फक्त निलेश सांबरे यांनाच बदनाम करण्याचा हा राजकीय कट आहे. इतर ठेकेदारांबाबत आंदोनलकर्ते काहीच बोलत नाहीत. यावरून त्यांचा हेतू दिसून येतो.

—महेंद्र ठाकरे, पालघर लोकसभा अध्यक्ष, जिजाऊ संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -