घरपालघरराशन दुकानदार संपात सहभागी न झाल्याने दिलासा

राशन दुकानदार संपात सहभागी न झाल्याने दिलासा

Subscribe

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपात सहभागी होण्याबाबतचे कुठलेही निवेदन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी अद्यापपर्यंत दिलेले, नसल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी ज्ञानदेव ठोंबरे यांनी दिली आहे.

मोखाडा: राज्यातील कोटी गरीब कुटुंबांना सरकारच्या स्वस्त धान्याचा आधार आहे. राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी कालपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे गरीब कुटुंबांची उपासमार होणार आहे. मात्र, मोखाड्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी तूर्तास या संपात, सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोखाड्यातील गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपात सहभागी होण्याबाबतचे कुठलेही निवेदन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी अद्यापपर्यंत दिलेले, नसल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी ज्ञानदेव ठोंबरे यांनी दिली आहे.

अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात हजारो शिधा पत्रिका धारक कुटुंब शासनाच्या स्वस्त धान्यावर अवलंबून आहेत. तालुक्यात 64 स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यांच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना, अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटूंबांना सरकारकडून धान्य वितरण केले जाते. यामध्ये अन्नपूर्णा, अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब शिधा पत्रिका धारक कुटुंबांना, शासनाकडून मोफत धान्य दिले जाते. तालुक्यात अंत्योदय शिधा पत्रिका धारक 48 हजार 745 तर प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिका धारक 42 हजार 887 असे एकूण 91 हजार 632 सरकारचे स्वस्त धान्य पात्र लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात 7 तारखेच्या दरम्यान धान्य वाटप करण्यात येते.

- Advertisement -

या संपात आमच्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन संघटनेचेचे स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झालेले नाहीत. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आम्ही धान्याची तूर्तास उचल करणे सुरू केले आहे. त्यानंतर धान्य वाटप करणार आहोत. मात्र, संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा पुढील आदेश आल्यानंतरच संपात सहभागी होण्याचा निर्णय घेणार आहोत.

– नामदेव लहामगे, तालुका अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -