घरपालघरपाणीपुरवठा सेवेतील उत्पन्न घटले

पाणीपुरवठा सेवेतील उत्पन्न घटले

Subscribe

वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा सेवेतील अपेक्षित उत्पन्नात मागील चार वर्षांच्या तुलनेत प्रचंड घट झाली असल्याचे अर्थसंकल्पातील आकडेवारीवरून समोर आले आहे.

वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा सेवेतील अपेक्षित उत्पन्नात मागील चार वर्षांच्या तुलनेत प्रचंड घट झाली असल्याचे अर्थसंकल्पातील आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वसई-विरार महापालिकेच्या २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पात पालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे म्हटले होते. त्याद्वारे अनधिकृत नळजोडण्या शोधून काढून त्या नळजोडण्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या नळजोडण्या ग्राहकांना नियमित करून घेण्याची संधी असल्याने महापालिकेच्या अपेक्षित उत्पन्नात भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. महापालिकेने त्यावेळी पाणीपुरवठा सेवेतून अपेक्षित उत्पन्न तब्बल २६८ कोटी ६८ लाख ७० हजार रुपये इतके गृहीत धरले होते.

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पातही नळजोडण्या आणि दंडात्मक कारवाईबाबत पुनर्उल्लेख करताना महापालिकेद्वारे होणारा पाणीपुरवठा ठोक स्वरूपात होत असल्याने पाणीपट्टी आकारणीदेखील ठोक स्वरूपात वसूल केली जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे प्रत्यक्ष वापरानुसार मागणी देयक बजावल्यास पाणीपट्टी उत्पन्नात भरीव वाढ अपेक्षिली होती. त्यानुसार महापालिकेने १७८ कोटी ८८ लाख ३५ हजार इतके उत्पन्न अपेक्षा व्यक्त केली होती. अपेक्षित धरले होते.

- Advertisement -

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मात्र पाणीपुरवठा सेवेच्या अपेक्षित उत्पन्नाबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र महापालिका क्षेत्रात ४६ हजार नळजोडण्या देण्यात आल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्याने जलमापके बसवण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार असल्याचे म्हटले होते. याशिवाय १८ ठिकाणी जलकुंभांची कामे प्रगथीपथावर असल्याचे माहितीही देण्यात आली होती.

दरम्यान, २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात महापालिकेने विशेष पाणीपट्टीद्वारे २०२१-२२ मध्ये ६० कोटी ९९ लाख व २०२२-२३ मध्ये ७० कोटी जमा अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर बांधकाम परवानगी देताना विकासकाकडून वसूल केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा स्रोत विकास शुल्कापासून २०२१-२२ मध्ये ५४ कोटी ८३ लाख व २०२२-२३ मध्ये ८५ कोटी जमा अपेक्षिली आहे. वाढीव पाणी उपलब्ध झाल्याने नवीन नळजोडण्या मंजूर करण्यात येत असल्याची माहितीही या अर्थसंकल्पातून महापालिकेने दिली आहे. मात्र मागील चार वर्षांच्या तुलनेत महापालिकेच्या पाणीपुरवठा सेवेतून अपेक्षित उत्पन्न वाढण्याऐवजी कमी होत असल्याने नागरिकांनी महापालिकेवर टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

आकड्यांचा फुगवटा?

२०२०-२१ व २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातील पाणीपुरवठा व अन्य सेवांतील अपेक्षित उत्पन्न व योजनांतील आकडेवारीचा फुगवटा हा मोठा आहे. या दोन वर्षी महापालिकेवर बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. त्यामुळे महापालिकेचे दोन्ही अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्षांच्या माध्यमातून मांडले गेले होते. २८ जून २०२ मध्ये महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपणार असल्याने या काळात महापालिकेच्या निवडणुका लागणे अपेक्षित होते. त्यामुळे अर्थसंकल्पातून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला होता. मात्र मार्च २०२० मध्ये कोविडमुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्या अद्याप झालेल्या नाहीत. सत्ताधाऱ्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पांच्या तुलनेत मागील २०२१-२२ व २०२२-२३ मधील आयुक्तांनी सादर केलेले अर्थसंकल्प हे वास्तवावर आधारित असावेत, अशी शक्यता वसई-विरारकरांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

बबनराव लोणीकरांनी अखेर वीजबिल भरलं, महावितरणाने कापली होती वीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -