घरपालघरअतिरिक्त कामामुळे स्वच्छता निरीक्षक व्यस्त

अतिरिक्त कामामुळे स्वच्छता निरीक्षक व्यस्त

Subscribe

महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक निलेश जाधव यांच्यावर अतिरिक्त कामांचा प्रचंड बोजा टाकण्यात आल्याने त्यांना सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकारांना माहिती देण्यासाठी वेळ मिळत नाही.

वसई : महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक निलेश जाधव यांच्यावर अतिरिक्त कामांचा प्रचंड बोजा टाकण्यात आल्याने त्यांना सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकारांना माहिती देण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक अडचणी सांगायच्या कुणाला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. त्यासाठी जाधव यांच्या खांद्यावरील कामाचा बोजा कमी करून त्यांना दैनंदिन काम करण्यासही मोकळीत द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय राणे यांनी आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे केली आहे.

वसई-विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात निलेश जाधव हे ’आरोग्य निरीक्षक’ म्हणून कार्यरत आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा विभाग अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने नागरी समस्या, अडचणी आणि त्या अनुषंगाने येणारी अन्य कामे सोडवणे, ही या विभागातील सर्व कर्मचारी आणि आधिकारी यांची नैतिक जबाबदारी आहे. किंबहुना सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांच्या, पत्रकारांच्या तक्रारी, समस्या, अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे, प्रत्यक्ष भेट घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आरोग्य निरीक्षक निलेश जाधव हेदेखील याला अपवाद ठरत नाहीत. पण, मागील काही महिने निलेश जाधव आपल्या जबाबदारी व कर्तव्यापासून दूर पळताना दिसत आहेत.

- Advertisement -

नागरिकांची प्रत्यक्ष भेट व त्यांच्याशी संवाद किंवा त्या करताचे फोन घेणे ते जाणीवपूर्वक टाळत आहेत, अशी तक्रार राणे यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांसह वसई-विरार महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सामाजिक कार्यकर्ते, जनतेशी व पत्रकारांसोबत सुसंवाद साधत असतात. त्यांना आवश्यक ती माहिती देत असतात. पण, केवळ आरोग्य निरीक्षक निलेश जाधव यांनाच नागरिक व पत्रकारांची ’ऍलर्जी’ का असावी? असा प्रश्न उपस्थित करून याचा कृपया खुलासा करण्यात यावा, अशीही मागणी राणे यांनी केली आहे.
जाधव यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार असेल आणि त्यामुळे त्यांना सामाजिक कार्यकर्ते, नागरिक किंवा पत्रकार यांच्या अडचणी, समस्या व तक्रारी ऐकण्यास किंवा त्यांना माहिती देण्यास वेळ मिळत नसेल तर त्यांच्या खांद्यावरील अतिरिक्त कामाचे ओझे कमी करून त्यांना नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही राणे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -