घरपालघर16 पोलीस ठाण्यांसह अधीक्षक कार्यालय ‘नॉट रिचेबल’

16 पोलीस ठाण्यांसह अधीक्षक कार्यालय ‘नॉट रिचेबल’

Subscribe

वसई विरार नालासोपारा येथील पोलीस ठाण्याच्या कार्यकारभारासाठी मिरा रोड -भाईंदर, विरार- वसई पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

सफाळे: पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणार्‍या 16 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि ठाणे अंमलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्य भार हाकणार्‍या विविध अधिकार्‍यांना गृह विभागातर्फे देण्यात आलेल्या मोबाईलच्या बिलाची रक्कम मोबाईल कंपनीकडे अदा न केल्यामुळे कंपनीने पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांची मोबाईल सेवा गेल्या चार महिन्यांपासून खंडित केली आहे. यामुळे नागरिकांना आपल्या कामासाठी संपर्क साधणे कठीण होऊन बसले आहे. ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे निर्मिती झाल्यानंतर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाची निर्मिती देखील लागलीच करण्यात आली. मात्र त्यानंतर तीन वर्षानंतर पालघर पोलीस अधीक्षकाच्या कार्यक्षेत्र अंतर्गत असलेल्या वसई विरार नालासोपारा येथील पोलीस ठाण्याच्या कार्यकारभारासाठी मिरा रोड -भाईंदर, विरार- वसई पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

मात्र शासनाने पोलीस ठाण्याला दिलेल्या सुविधांच्याबाबत अद्यापही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तालय यांचे आर्थिक व्यवहार वेगळे न केल्याने मोबाईलच्या बिलांच्या प्रश्न अद्यापही त्यामुळे सुटू शकला नाही. पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ठाणे, अंमलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनेक महत्त्वपूर्ण अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सात वर्षांपूर्वी आयडिया कंपनीचे सिम मोबाईल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले होते. अधिकारी आणि कर्मचारी बदलले तरी संपर्क क्रमांक तोच असल्याने नागरिकांना ते अधिक सोयीचे झाले होते. यामुळे बहुतांश अधिक कार्य आणि कर्मचारी यांचे खासगीतील संपर्क क्रमांक उपलब्ध नाहीत.तसेच संपर्क क्रमांक असलेल्या सिमची सेवा बिलामुळे बंद झाल्यामुळे चार महिन्यांपासून नागरिकांची गैरसोय झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया

जिल्हा पोलीस कार्यालयाला प्रचंड बिल येत आहे. अधिक चौकशी केली असता मीरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाचे मोबाईल वापराचे बिल देखील पालघर पोलीस कार्यालयाला पाठविण्यात येत आहे. मात्र सदरचे बिल वेगळे करून दिल्याशिवाय बिल भरले जाणार नाही.
– बाळासाहेब पाटील. पोलीस अधीक्षक, पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -