घरपालघरसतत गैरहजर राहत असल्यामुळे कर्मचार्‍याचे निलंबन

सतत गैरहजर राहत असल्यामुळे कर्मचार्‍याचे निलंबन

Subscribe

तसेच नागरिकांना वेळेत माहिती पुरविणे शक्य होत नसल्यामुळे भोईर यांची अन्य विभागात बदली करण्याबाबत नगररचना विभागाकडून पत्र देण्यात आले होते.

भाईंदर :-मीरा -भाईंदर महापालिकेतील आस्थापना विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक विवेकानंद भोईर हे कामावर सतत गैरहजर राहत असल्यामुळे तसेच कामात नितांत सचोटी व कर्तव्यतत्परता ठेवली नसल्याचे दिसून आल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसे पत्र पालिका मुख्यालयाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी काढले आहे. महापालिकेतील विवेकानंद भोईर, वरिष्ठ लिपीक यांची नगररचना विभागात बदली करण्यात आली होती. परंतु भोईर हे नगररचना विभागात हजर झाल्यापासून नगररचना विभागात नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे माहिती अधिकार अंतर्गत असलेला कामाचा वेळेत निपटारा होत नव्हता. तसेच नागरिकांना वेळेत माहिती पुरविणे शक्य होत नसल्यामुळे भोईर यांची अन्य विभागात बदली करण्याबाबत नगररचना विभागाकडून पत्र देण्यात आले होते.

त्यानुसार भोईर यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर भोईर यांची नगररचना विभागात सतत गैरहजर राहिल्याने तसेच कामात टाळाटाळ करत असल्याने त्यांची आस्थापना विभागामध्ये बदली करण्यात आली होती. परंतु ते आस्थापना विभागामध्ये हजर झाल्यापासून कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांना दोन वेळेस नोटीस बजाविण्यात आली होती. तसेच वरिष्ठांची कुठल्याही प्रकारे पूर्वपरवानगी न घेता १० मे पासून नोटीस देई पर्यंत कामावर गैरहजर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -