घरठाणेठामपा व शेल्टर संस्थेच्यावतीने लोकमान्यनगर वस्तीमध्ये मासिक पाळी दिन साजरा

ठामपा व शेल्टर संस्थेच्यावतीने लोकमान्यनगर वस्तीमध्ये मासिक पाळी दिन साजरा

Subscribe

मासिक पाळी स्वच्छता दिनी जनजागृती उपक्रमाचे आयोजन

संपूर्ण जगामध्ये २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.  या दिनाच्या निमित्ताने ठाणे  महानगर पालिका,  शेल्टर असोसिएट्स आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार २८ मे २०२३ रोजी लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळा येथे जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन दूर व्हावेत यासाठी विविध जाणीव जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या उपक्रमात मासिक पाळी संदर्भात गाणी, व्याख्याने, प्रश्नोत्तरे,खेळ आणि तज्ञांचे वस्ती मधील रहिवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे मॅडम यांनी मासिक पाळी संदर्भात समाजात पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा गैरसमज यांच्या विषयी मार्गदर्शन करून या शरीर धर्माचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. त्याचसोबत मासिक पाळी संदर्भात उपस्थित महिलांवर पुरुषांमध्ये प्रश्न उत्तराद्वारे त्यांच्या मनात असलेले समज गैरसमज दूर करण्यात आले. या कार्यक्रमात शेल्टर संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापिका धनश्री गुरु यांनी संस्था करत असलेल्या मासिक पाळी स्वच्छता प्रकल्पावर ही मार्गदर्शन करीत ठाण्यामध्ये विविध वस्त्यांमध्ये जवळजवळ २००० महिलांनी मेंस्ट्रुअल कप वापरण्यास सुरुवात केलेली आहे याचा परिणाम असा की सॅनिटरी नॅपकिन मुळे होणारा कचरा आपोआप कमी झाला व कप वापरामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास तसेच पैशाची बचत होण्यास मदत होत आहे. मासिक पाळी याबद्दल लपून छपून चर्चा करून चुकीचा अर्थ मनात ठेवण्यापेक्षा उघडपणे त्यावर बोलून योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केलं.

- Advertisement -

म्यूज फाउंडेशन संस्थेचे निशांत बंगेरा यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला पुरुषांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास लोकमान्य नगर चे नगरसेवक हनुमंत जगदाळे साहेब, व महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी चे घाडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास ठाणे महापालिकेचे कर्मचारी, शेल्टर संस्थेचे वैभव काळे, अमोल गाडे, सुनिता सकुंडे, अरविंद राठोड, व योगिता शिंदे उपस्थित होते. जागतिक मासिक पाळी दिनाच्या मासिका महोत्सवात लोकमान्य नगर वस्तीमध्ये स्थानिक स्त्री आणि पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -