Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर पालघर सफाळ्यात मासे चोरांचा उच्छाद

सफाळ्यात मासे चोरांचा उच्छाद

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील खारजमिनीवर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कोलंबी प्रकल्प उभारले गेले असून काही स्थानिक गावकऱ्यांकडून या प्रकल्पातून दिवसाढवळ्या कोळंबी आणि इतर माशांची चोरी केली जात आहे.

Related Story

- Advertisement -

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील खारजमिनीवर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कोलंबी प्रकल्प उभारले गेले असून काही स्थानिक गावकऱ्यांकडून या प्रकल्पातून दिवसाढवळ्या कोळंबी आणि इतर माशांची चोरी केली जात आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रकल्पाच्या मालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्याने केळवा सागरी आणि सफाळे पोलिसांनी चोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

सफाळे भागातील प्रसिद्ध असलेले बाबाजी कोलंबी प्रकल्प सफाळे पश्चिमेला ३५० हेक्टर खाऱ्या सरकारी जमिनीवर करारानुसार उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे मालक अजित पाटील आहेत. सफाळे येथील टेंभीखोडावे,जलसार, विराथन बुद्रुक वेढी या हद्दीतील खाऱ्या सरकारी जमिनीवर हा प्रकल्प १९९१ साली उभा करण्यात आला असून या प्रकल्पाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या प्रकल्पाचा मालक आज डबघाईला आला आहे. कारण या प्रकल्पामध्ये सोडलेल्या खाजरी मासा आणि टायगर नावाची कोलंबी भरदिवसा चोरी केली जात आहेत. या त्रासाला कंटाळून प्रकल्पाच्या मालकाने चोरांविरोधात पोलीस तक्रारी करून देखील चोर भरदिवसा खुलेआमपणे चोरी करत असल्यामुळे अखेर सफाळे आणि केळवा सागरी पोलिसांनी यांना रंगेहात पकडून या चोरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यातील चिखलपाडा येथील एक तरुणाला जेल देखील झाली आहे. तर वैती पाडा जलसार येथील एका तरुणांवर खाजरी आणि कोलंबी चोर असे स्टॅम्प गावकऱ्यांनी देखील लावले आहेत.

- Advertisement -

दादागिरी करून राजरोजपणे मासे चोरी केले जात आहेत. यामुळे या प्रकल्पाच्या मालकाने अखेर पोलीस तक्रारी हा शेवटचा पर्याय अवलंबला आहे. खाजरी प्रजाती आणि बियाणे वाढण्यासाठी वीस ते पंचवीस वर्षापासून पाटील यांनी प्रकल्पांमध्ये वाढवलेले १० ते १२ किलोच्या खाजऱ्या चोरी करून विक्री करत आहेत. स्थानिक लोकांना खाजरी बियाणे लागल्यास अत्यंत कमी दरात व्यवसाय करण्यासाठी देण्यात येईल, असे आवाहन पाटील यांनी गावकऱ्यांना केले आहे.
दरम्यान, केळवा आणि सफाळे पोलीस ठाण्यात मासे चोरीप्रकरणी अनेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच याप्रकरणी कोर्टात केसेस चालू आहेत. या भागातील चोरट्यांना आळा बसावा म्हणून सफाळे आणि केळवा पोलिसांकडून रस्त्यारस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच रात्रीही या भागात पोलिसाकडून पेट्रोलिंग करण्यात येत आहे. त्यानंतरही मासे चोरांवर अंकुश बसत नसल्याने कोळंबी प्रकल्पग्रस्त हैराण झाले आहेत.

हेही वाचा –

- Advertisement -

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कोस्टल रोडला चालना देत महापालिकेचा आराखडा तयार

- Advertisement -