घरठाणेठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कोस्टल रोडला चालना देत महापालिकेचा आराखडा तयार

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कोस्टल रोडला चालना देत महापालिकेचा आराखडा तयार

Subscribe

घोडबंदर रोड या मार्गावर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सुमारे १३ किमीचा कोस्टल रोड हा काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी असा तयार केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

शहरातील वाहतूक कोंडीतुन मार्ग काढण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव ते गायमुख चौपाटी असा तयार होणाऱ्या कोस्टल रोडचा आराखडा आता ठाणे महापालिकेने तयार केला आहे. तसेच तो आराखडा एमएमआरडीएकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचदरम्यान एमएमआरडीएने सीआरझेडच्या परवानग्या घेण्याच्या सुचना केल्या असून त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात करून लवकरच तो प्रस्ताव महाराष्ट्र किनारपटटी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करण्यात येईल, असेही सूत्रांनी म्हटले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोस्टल रोडची १२ वर्षाच्या कागदावरील वनवसातून सुटका होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. घोडबंदर रोड या मार्गावर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सुमारे १३ किमीचा कोस्टल रोड हा काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी असा तयार केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे.

यासाठी १२५१ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या रोडची चर्चा २००९ साली सुरु झाली होती. ठाण्यातील माजिवाडा नाक्यापासून ते घोडबंदर टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोंडीचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करून वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कोस्टल मार्गाची घोषणा केली होती. त्यातच आता महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाचा आराखडा नुकताच तयार केला असून आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हा आराखडा पाठविण्यात आला आहे. या मार्गात सुमारे ४० टक्के सीआरझेड बाधीत होणार आहे. त्यामुळे ती कशी कुठे, कशा पध्दतीने बाधीत होणार आहे, याचा आरखडा पालिकेने तयार केला असून आता त्याची परवानगी घेण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात एम.सी.झेडकडे पालिका हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्यानुसार पुढील तीन ते चार दिवसात त्याला परवानगी मिळून या मार्गातील प्रमुख अडथळा दूर होणार असल्याची शक्यता पालिका सूत्रांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

अत्यावश्यक सेवेसाठी स्वतंत्र मार्गिका

हा मार्ग सुमारे १३ किमीचा असणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याुनसार ४० ते ४५ मीटरचा आठपदरी रस्ता असणार आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. १.१३ किमीचा उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका असा हा मार्ग असणार आहे. एकूण मार्गापैकी ७.२९ किमीचा मार्ग सीआरझेड भागातून जाणार आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -