घरपालघरविहीर चोरीला गेलीय ! पेसा योजनेच्या मंजूर निधीचा अपहार

विहीर चोरीला गेलीय ! पेसा योजनेच्या मंजूर निधीचा अपहार

Subscribe

प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी बांधकाम साहित्य टाकले गेल्याचे सांगण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात जागेवर ना विहिरीचे खोदकाम झाले ना कुठले बांधकामासाठी लागणारी साधन सामग्री टाकण्यात आली आहे.

वाणगाव :  डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्सेच्या पेसा निधीमधून मंजूर विहिरीचे काम न करताच ८० हजार रुपयांचा निधी हडप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. उर्से आंबाडी पाडा येथील विहिरीचे काम ग्रामपंचायत पेसा योजनेतून मंजूर होऊन या कामासाठी २.५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे काम वाटप होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करताच एका बांधकाम साहित्याचा पुरवठा करणार्‍या वाघोबा ट्रान्सपोर्ट नावाच्या खात्यावर ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून ८२ हजारांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश कामाचे कंत्राट घेणार्‍या व्यक्ती किंवा एजन्सीच्या नावे देणे आवश्यक असताना बांधकाम साहित्य पुरविणार्‍या व्यक्तीच्या नावे देण्यात आल्याने यात मोठे गौडबंगाल असल्याचा आरोप केला जातो आहे. प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी बांधकाम साहित्य टाकले गेल्याचे सांगण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात जागेवर ना विहिरीचे खोदकाम झाले ना कुठले बांधकामासाठी लागणारी साधन सामग्री टाकण्यात आली आहे.

पेसा निधीतून आदिवासी नागरिकांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात येणारी विहीर देखील तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने लुटून खाण्याचा हा प्रकार गंभीर असल्याने यात सामील सर्वांची सखोल चौकशी करून फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबाडी पाड्यातील आदिवासी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

उर्से आंबडी पाडा येथे नवीन विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते.त्यावेळी या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी लागणारी साधन सामग्री ठेवली होती. परंतु आता माझी दुसर्‍या ठिकाणी बदली झाल्याने सध्या स्थितीमध्ये विहिरच्या कामा संदर्भात माहिती नाही.
– राजेंद्र गायकवाड
तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत उर्से

उर्से आंबाडी पाडा येथे ग्रामपंचायत पेसा निधीतून मंजूर विहिरीच्या जागेचे स्थळ पाणी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल.
– किशोर आक्रे, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत, उर्से

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -