घरपालघरपरिवहनच्या बस ड्रायव्हरला रिक्षाचालकांकडून मारहाण

परिवहनच्या बस ड्रायव्हरला रिक्षाचालकांकडून मारहाण

Subscribe

इतकेच नाही तर थेट बसमध्ये घुसून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी सरकारी कर्तव्यावर असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिक्षा चालकांविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : वसई- विरार महापालिकेच्या परिवहनच्या बस ड्रायव्हरला मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी रिक्षा चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालकांच्या दादागिरीने सिमा पार केली असून आता थेट परिवहनच्या बस ड्रायव्हरलाच मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वसईतील रानगावात राहणारे सागर हनुमंत मोटे (३०) वसई- विरार महापालिकेच्या परिवहनच्या बसचे ड्रायव्हर म्हणून काम करतात. २८ मार्चच्या दुपारी तीनच्या सुमारास वसई पूर्वेकडील फादरवाडी येथील इंडियन पेट्रोल पंप सिग्नलजवळ रिक्षाला बसचा धक्का बसल्याचे सांगत मोटे यांची बस थांबवून त्यांना शिवीगाळ केली. इतकेच नाही तर थेट बसमध्ये घुसून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी सरकारी कर्तव्यावर असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिक्षा चालकांविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नालासोपारा येथे भाड्यावरून वादावादी झाल्याने रिक्षा चालकाने दंडुक्याने एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर सध्या गाजत आहे. पण, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढतच चालली आहे.
वसई- विरार शहरात वीस हजारांहून अधिक अनधिकृत रिक्षा आहेत. बहुतांश रिक्षाचालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. आरटीओने शेअर रिक्षाचे दर ठरवून दिले असताना रिक्षाचालक ते धुडकावून मनमानी भाडेवसुली करत प्रवाशांची अडवणूक करताना दिसतात. विरोध करणार्‍या प्रवाशांना थेट मारहाण होत असल्याचे प्रकार अनेकदा घडत असतात.
रात्रीच्यावेळी तर बेकायदा रिक्षा आणि बेकायदा रिक्षाचालकांचा धुडगूस सुरु असतो. अनेक रिक्षाचालक दारु प्यालेले असतात. त्यांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असतो. पण, वाहतूक पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे,असा आरोप होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -