घरपालघरमहामार्ग कंत्राटदार कंपनीच्या गाड्या जाळल्या

महामार्ग कंत्राटदार कंपनीच्या गाड्या जाळल्या

Subscribe

याबाबत मुंबई बरोदा मालवाहू महामार्ग प्रकल्पाच्या कंत्राटदार मोन्टीकार्लो कंपनीच्या उप कंत्राटदार सलीम टाक मोहमद खान यांनी मनोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मनोर: पालघर जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई -बडोदा मालवाहू महामार्ग प्रकल्पाच्या कंत्राटदार मोन्टीकार्लो कंपनीच्या उप कंत्राटदार सलीम टाक मोहमद खान यांच्या आणि कामगारांच्या वादात कंत्राटदार मोन्टीकार्लो कंपनीच्या गाड्यांना आग लावण्यात आली आहे. या बाबत हकीकत अशी की,महामार्गाचे काम चालू असलेल्या चिंचले या गावी गाडीच्या टायर देण्यावरून वाद होऊन,हा वाद विकोपाला जाऊन कंत्राटदार कंपनीच्या दोन हायवा आणि एक गाडी जाळण्यात आली.
याबाबत मुंबई बरोदा मालवाहू महामार्ग प्रकल्पाच्या कंत्राटदार मोन्टीकार्लो कंपनीच्या उप कंत्राटदार सलीम टाक मोहमद खान यांनी मनोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मुंबई -बडोदा मालवाहू महामार्ग प्रकल्पाच्या कंत्राटदार मोन्टीकार्लो कंपनीच्या कंत्राटदार मे.राजेश धरमसिंग कलठीया या कंत्राटदार कंपनीकडे उप कंत्राटदार सलीम टाक मोहमद खान यांच्यात आणि काही कामगारांमध्ये गाडीच्या टायर देवाण -घेवाणीवरून वाद झाला होता.त्या बाबत राग मनात धरून कामगारांनी तीन गाड्यांना आग लावून जाळण्यात आल्या आहेत.या बाबत मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेठे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

या बाबत आमचे अधिकारी-कर्मचारी अधिक तपास करत असून,लवकरच आरोपींना जेलबंद करण्यात येईल.
-उमेश पाटील,
मनोर पोलीस ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -