घरपालघरपाणी भरण्यासाठी रोजगारावर पाणी, चोथ्याची वाडी गावात पाणी प्रश्न तापला

पाणी भरण्यासाठी रोजगारावर पाणी, चोथ्याची वाडी गावात पाणी प्रश्न तापला

Subscribe

त्यामुळे या गावातील महिलांना रात्रंदिवस पाणी भरण्याच्या नादात भूक,तहान हरपून रोजगाराला देखील मुकावे लागण्याची परिस्थिती ओढवली आहे.

जव्हार: जव्हार शहराच्या पायथ्याशी तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या चोथ्याची वाडी या गावात १३० कुटुंबे वास्तव्यास आहेत. या गावात एकूण ४ कूपनलिका असून त्यापैकी ३ कूपनलिका बंद अवस्थेत असून केवळ एका कूपनलिकेवर संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याचे गावातील महिलांनी सांगितले. शिवाय ,पाणी व्यवस्थापनासाठी या गावात २ विहिरी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांनी देखील तळ गाठला आहे.त्यामुळे या गावातील महिलांना रात्रंदिवस पाणी भरण्याच्या नादात भूक,तहान हरपून रोजगाराला देखील मुकावे लागण्याची परिस्थिती ओढवली आहे.

पाणी भरण्यासाठी रात्री दोन वाजेपासून वाट पहावी लागते. या मुळे रोजगार हमी योजनेच्या कामावर रुजू न झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होत चालली आहे. पहाटे दोन वाजेपासून पाणी भरण्यासाठी जागे राहावे लागते.या मुळे झोप देखील सुरळीत होत नाही. अनेक महिला या आजारी देखील पडत आहेत.रोजगार हमीच्या कामाला जाता येत नाही.त्यामुळे आर्थिक चणचण सुरू आहे,असे स्थानिक महिला शारदा पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

जव्हार पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे पाणी टँकर मिळावा म्हणून अर्ज केला आहे.परंतु त्यावर अजून कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नाही.
-नरेंद्र मुकणे,सामाजिक कार्यकर्ते

जव्हार पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागामार्फत चोथ्याची वाडी या गावात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असून येथे टँकर सुरू करणे तथा गावातील एका खासगी मालकीच्या विहिरीतून पाणी व्यवस्था होऊ शकते का याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
-संदीप घेगड,ग्रामसेवक
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -