घरपालघरमेट्रोच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचा मृत्यू

मेट्रोच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचा मृत्यू

Subscribe

तसेच संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मृत कामगाराचा दोन मुले, पत्नी असा परिवार असून तो मूळचा बिहारचा आहे.

भाईंदर:- मीरा- भाईंदर शहरात मेट्रो मार्गिका क्रं. ९ काम प्रगतीपथावर सुरू आहे.परंतु, मेट्रोच्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.मेट्रो कामगारांकडून एका व्यक्तीवर क्रेन चढवण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना सोमवारी जे. कुमार या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. पिलरवरून खाली पडून तोंडावर गंभीर दुखापत झाल्याने कामगाराचा मृत्यू झाला. मिरारोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मृत कामगाराचा दोन मुले, पत्नी असा परिवार असून तो मूळचा बिहारचा आहे.

सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास मॅनेजरचा फोन आला की मोहन पिलरवर चढून नट फिट करत असताना खाली पडला आणि नाकावर दुखापत झाली आहे. आपण लवकर या. मी पोहोचण्याच्या अगोदर त्याचा मृत्यू झाला होता. मोहन याचे कुटुंब बिहारला असल्याने मृतदेह बिहारमध्ये घेऊन जाण्यासाठी मेट्रो अधिकार्‍यांना विनंती केली आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कुटुंबातील सदस्य संजय मुसाद यांनी दिली. या संदर्भात मिरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बागल यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले. मेट्रो मार्गिका क्रं. ९ या प्रकल्पात एक हजार पेक्षा अधिक कामगार काम करत आहे. त्यांच्या सुरक्षेकडे ठेकेदाराकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे.काम करत असताना त्यावेळी मोहनकडे जर सुरक्षा जॅकेट असते तर त्याचा जीव वाचला असता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -