घरनवी मुंबई पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

 पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Subscribe

प्रशासनाच्या कारभारावर महाडकर संतापले

 

महाड: येथील नगर पालिकेचा कारभार सद्या प्रशासनाच्या ताब्यात असल्याने शहरात विविध विकास कामे ठप्प असल्याने आणि नागरिकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी करत सोमवारी मुख्याधिकारी कार्यालयावर धडक दिली. गेली आठवडाभर ठप्प असलेला पाणीपुरवठा त्वरीत सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहरवासीयांना कोथुर्डे धरणातून पाणीपुरवठा केला जात असून तेथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तरीही नागरिकांनी संयम दाखवला. मात्र दोन दिवसानंतरही पाणीपुरवठा पूर्ववत होत नसल्याने अखेर महाडकरांनी काँग्रेस पक्षाचे हनुमंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी कार्यालय गाठले. पाणीपुरवठा का पूर्ववत होत नाही याबाबत जाब विचारून ज्यांच्यामुळे पाणीपुरवठा ठप्प आहे त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली. यावेळी शहरातील विविध समस्यांवर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. महामार्ग चौपदरीकरण आणि त्यात बाधित होणारी जलवाहिनी याबाबत नियोजन का केले नाही, असा प्रश्नही यावेळी जगताप यांनी प्रशासनाला केला.
प्रशासन नागरिकांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केला. शहरात पुन्हा कचरा पडून राहत आहे तसेच गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील असे सांगण्यात आले होते मात्र अद्याप खड्डे भरले गेलेले नाहीत. शहरात बांधकाम परवाने देखील मुदतीत दिले जात नाहीत आदी मुद्द्यांकडे त्यांनी मुख्याधिकारी रोडगे यांचे लक्ष वेधले. मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते याला कारणीभूत असलेल्या हातगाड्या, पदपथावर बसणारे विक्रेते आणि मोकाट गुरे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे देखील संदीप जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी अनधिकृत बांधकामांबाबत देखील हनुमंत जाधव यांनी मुख्याधिकारी रोडगे यांना विचारणा करून अनधिकृत बांधकामे हटवताना भेद केला जावू नये अशी सूचना केली.

- Advertisement -

पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. प्राथमिक चाचणी केल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. तसेच पोलीस बंदोबस्त प्राप्त होताच रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे हटवली जातील.
– महादेव रोडगे
मुख्याधिकारी, नगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -