घरफोटोगॅलरीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

Subscribe

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चार जण ठार तर २ जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या वेळेसे ही दुर्घटना घडली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर येथील रसायजीजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सातारा येथून लग्न समारंभ उरकून मुंबई येथे जात असताना पहाटे अपघात. सर्व छाया सुमित रेनोसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -