घरगणेशोत्सव 2023Photo : गणेशभक्तांची श्रद्धा अन् प्रतिभा...

Photo : गणेशभक्तांची श्रद्धा अन् प्रतिभा…

Subscribe

मुंबई : मुंबईसह राज्यभरात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे मंगळवारी (19 सप्टेंबर 2023) वाजतगाजत आगमन झाले. गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी झाली. ‘भाव तिथे देव’ असे म्हटले जाते, गणरायाच्या बाबतीत सर्वत्र श्रद्धाभावच दिसत आहे. याच भावनेतून गणेशभक्तांनी विविध प्रकारची आरास केली. त्यात भारताने स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटले नसते तर नवलच!

- Advertisement -

सांताक्रूझमधील दीपक मकवाना यांच्या निवासस्थानी गणराज ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये विराजमान झाले आहेत. याशिवाय, या देखाव्याला त्यांनी दृक-श्राव्यतेचीही जोड दिली आहे.

- Advertisement -

 

जेकब सर्कलच्या शांती नगरमधील बाळगोपाळ गणेश मित्रमंडळाने भारताची शान असलेल्या ‘चांद्रयान-3’चा देखावा साकारला आहे.

जी-20चे अध्यक्षपद भारताकडे होते. त्या अनुषंगाने जी-20 शिखर परिषदेचे राजधानी दिल्लीत यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. त्याचा देखावा देखील मुंबई पोर्ट ट्रेस्टचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे यांनी आपल्या निवासस्थानी याची आरास केली.

प्रभादेवीतील विवेक मधुकर नागवेकर यांच्या घरातील नागवेकरांच्या राजाला 51 किलो फळांची आरास दाखविण्यात आली. ही फळे दुसऱ्या दिवशी जवळच्या अनाथ आश्रमात वाटप करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -