घरमहाराष्ट्रकोकणLok Sabha 2024 : कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल तर...; विनायक...

Lok Sabha 2024 : कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल तर…; विनायक राऊत यांनी सुनावले

Subscribe

कपटी लोकांसाठी मनसे जर पुढे येत असेल तर जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागेवर शिवसेना शिंदे गटाने आणि भाजपाने दावा केला होता. किरण सामंत या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक होते, मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नारायण राणेंना उमेदवारी मिळाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो, अशी चर्चा सध्या रंगली आहे. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपणच 2.5 लाख मतांनी जिंकणार, असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे, शिंदे गट आणि मनसेवर टीकास्त्रही सोडले आहेत. (Lok Sabha Election 2024 MNS coming forward for hypocrites public will show them place Vinayak Raut)

माध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष माझ्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरीत सभा होत आहे. त्यांच्या सभेच्या रूपाने माझ्या विजयाचा पाया रचला जाईल. त्यानंतर 3 मे रोजी कणकवलीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपात आले तर? फडणवीस म्हणाले, आत्याबाईला…

शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधताना विनायक राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि राष्ट्रपती राजवट लावली जाईल. पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला बाहेर फेकले जाईल, तर अजित पवारांना सुद्धा कार्य कक्षेबाहेर फेकले जाईल. भाजपा स्वतः एकटी निवडणूक लढवेल आणि शिंदे व अजित पवार मधल्यामध्ये लटकतील, असा दावा विनायक राऊत यांनी केला.

- Advertisement -

कपटी लोकांसाठी मनसे पुढे येतेय (MNS is coming forward for hypocritical people)

देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज असल्याने शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली. तसेच मनसेने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रचारही सुरू केला आहे. याचपार्श्वभूमीवर विनायक राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मनसेची रत्नागिरीत सभा होऊ दे. मोर नाचतो म्हणून तुडतुडं देखील नाचतो आहे. पण कोणाची तळी उचलत आहे, याचे भान ठेवा. मुंबई गुजरातला जोडायचे षडयंत्र सुरू आहे. गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे काम सुरू आहे. अशातच आता कपटी लोकांसाठी मनसे जर पुढे येत असेल तर जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा इशारा देतानाच विनायक राऊत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणावले की, विनायक राऊत हा मंत्री पदासाठी हपापलेला नाही. माझी पक्षासाठी निष्ठा कायम आहे. नारायण राणे यांनी मंत्री म्हणून काय दिवे लावले आहेत? ते आता तरी काय करणार आहेत? असे प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : सांगलीवर कसा काय हक्क सांगितला? विश्वजीत कदमांचा ठाकरेंना सवाल

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -