घरराजकारणलोकसभा 2024Lok Sabha 2024 : युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा, महुआ मोईत्रा..., तृणमूलकडून दिग्गज...

Lok Sabha 2024 : युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा, महुआ मोईत्रा…, तृणमूलकडून दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा या येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकतात. परंतु, त्याआधीच देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपा आणि काँग्रेसनंतर आता ममता बनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तृणमूलने 42 च्या 42 जागांवर उमेदवार जाहीर केल्याने पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे. तर, यंदाच्यावेळी तृणमूल काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गजांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. महुआ मोईत्रा, तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी, भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखे दिग्गज लोक तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. (Lok Sabha 2024: Yusuf Pathan, Shatrughan Sinha, Mahua Moitra nominated for Lok Sabha from Trinamool Congress)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : ममता बॅनर्जींचा एकला चलो रेचा नारा, तृणमूलकडून 42 जागांवर उमेदवार जाहीर

- Advertisement -

देशात विरोधकांची इंडिया आघाडी असली तरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बऱ्याचशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष हे एकटेच निवडणूक लढवणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाची चर्चा सुरू होती. परंतु, जागावाटपाबाबतचा कोणताही तोडगा न निघाल्याने अखेरीस ममता बॅनर्जी यांनी एकला चलो रेचा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये 42 जागांवर तृणमूल निवडणूक लढवणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील सभेत युसूफ पठाणच्या नावाची घोषणा केली. टीएमसीने पठाणला बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे खासदार आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाणला निवडणुकीच्या मैदानात उतरवून ममता बॅनर्जींनी मोठी खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

तर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांची खासदारकी रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या आरोपांनंतर तृणमूल काँग्रेस मोईत्रा यांना पुन्हा एकदा तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पक्षाने मोईत्रा यांच्यावर विश्वास ठेवला असून त्या कृष्णानगर येथून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्याशिवाय, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -