घरक्राइमKejriwal : कोर्टातील सुनावणीचा व्हिडीओ केला सोशल मीडियावर शेअर, सुनीता केजरीवाल अडचणीत

Kejriwal : कोर्टातील सुनावणीचा व्हिडीओ केला सोशल मीडियावर शेअर, सुनीता केजरीवाल अडचणीत

Subscribe

न्यायालयीन प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाचे वकील वैभव सिंग यांनी राऊज एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्याकडे तक्रार केली आहे.

नवी दिल्ली : अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. मात्र, आता अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता या अडचणीत येण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासंबंधींच्या कोर्टातील सुनावणीचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. याबाबत राऊज एव्हेन्यू कोर्टात तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुनाता केजरीवाल यांच्यासह तिमारपूरच्या नगरसेवक प्रमिला गुप्ता आणि राजस्थान काँग्रेसच्या उपाध्यक्ष विनीता जैन यांच्यासह इतर नेत्यांचाही त्यात समावेश आहे.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना एकूण दहा समन्स बजावले होते, मात्र तरीही ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. अशातच, आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्‍च न्‍यायालयात केली होती. यावर 21 मार्च 2024 सुनावणी झाली. तथापि, केजरीवाल यांना कठोर कारवाईपासून कोणतेही संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Vikhe vs Lanke : समोरच्या उमेदवाराची गंमत वाटते, कथित ऑडिओ क्लिपवरून लंकेंचा विखेंवर निशाणा

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात केजरीवाल यांना हजर करण्यात आले असता, 28 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली. तथापि, 28 मार्चच्या न्यायालयीन प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुनीता केजरीवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. यासंदर्भात उच्च न्यायालयाचे वकील वैभव सिंग यांनी राऊज एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्याकडे ही तक्रार केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित सर्व व्यक्ती आणि राजकीय पक्षांविरुद्ध योग्य कारवाईची मागणी वैभव सिंग यांनी केली आहे. न्यायालयीन कामकाजाची बदनामी तसेच फेरफार करण्याच्या हेतूने आपच्या अनेक सदस्यांसह इतरांनी न्यायालयीन कार्यवाहीचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले, असा आरोप याचिकादाराने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -