घररायगडजिल्हा रुग्णालयात ७ महिन्यात दगावली ४९ बालके

जिल्हा रुग्णालयात ७ महिन्यात दगावली ४९ बालके

Subscribe

प्रशासनाचा अनागोंदी कारभार

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

अलिबाग: येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या सात महिन्यात ४९ बालके दगावली असल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली असून यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी याबाबतचे सत्य उजेडात आणला असून त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानवर हल्लाबोल करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई
यांना याबाबत जाब विचारला आहे.या अनागोंदी कारभाराबद्दल आरोग्य विभागाचे वेळेत डोळे न उघडल्यास आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दळवीयांनी दिला आहे.
सोमवारी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या तीन महिलांची प्रसुती व्यवस्थित झाली, परंतु काही वेळातच त्यांचे बाळ दगावल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल या मृत्यूमुखी पडलेल्या पालकांचा संताप वाढला होता. मात्र, त्यांची दखल घेण्यास कोणीही पुढे आले नाही. अखेर या बालकांच्या पालकांनी दळवी आणि जिल्हा प्रमुख केणी यांची भेट घेतल्यानंतर या दोघांनीही जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी धाव घेतली. यावेळी प्रसुती कक्षातील आरोग्य व्यवस्था पाहून शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात केला जाणारा पैसा व्यर्थ जात असल्याल्याबद्दल संताप व्यक्त केला.

बिकट परिस्थिती
जिल्हाभरातून दिवसाला १५० च्या आसपास महिला प्रसुतीसाठी आलेल्या असतात; परंतु त्यांच्यावर वैद्यकिय उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच नसतात. कंत्राट बेसीसवरील परिचारीकांवर जबाबदारी सोपवून या विभागाच्या नव्यानेच नियुक्तीवर असलेल्या तीनही महिला डॉक्टर निघून जातात. या महिला डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ प्रसुती तज्ज्ञ डॉ. अनिल फुटाणे यांची नियुक्ती शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी कंत्राटी स्वरुपात केलेली आहे, परंतु ते देखील आपल्या खासगी रुग्णालयाच्या कारभारामुळे येथे वेळ देऊ शकत नाही, अशी बिकट परिस्थिती जिल्हा रुग्णालयात निर्माण झाली आहे.

—————————————————————-
महिना      मृत्यू                  प्रसूती                 एकूण
नॉर्मल / सीझर
—————————————————————-
एप्रिल        १३                  २१८ /९८             ३१६
मे             ७                  १७७/१०३             २८०
जून           ७                  १४५/१२४             २६९
जुलै          ४                   १८०/८३               २६३
ऑगस्ट       ६                   ७७/१३७              ३१४
सप्टेंबर        ८                   १८३/१३७             ३२०
ऑक्टोबर     ४                  १९८/१२८              ३२६
—————————————————————-
एकूण        ४९                 १२७८/८१०           २०८८
—————————————————————-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -