घररायगडनेरळ, शेलू पाणी योजनेसाठी ५२.८९ कोटी निधी

नेरळ, शेलू पाणी योजनेसाठी ५२.८९ कोटी निधी

Subscribe

कर्जत तालुक्यातील नेरळ आणि शेलू ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी नेरळ पाणी पुरवठा साठी ४० कोटी २९ लाख तर शेलू पाणी पुरवठ्यासाठी १२ कोटी ६लाख निधी मंजूर झाला असून या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही गावांना जोडलेल्या अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.

कर्जत:  तालुक्यातील नेरळ आणि शेलू ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी नेरळ पाणी पुरवठा साठी ४० कोटी २९ लाख तर शेलू पाणी पुरवठ्यासाठी १२ कोटी ६लाख निधी मंजूर झाला असून या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही गावांना जोडलेल्या अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.
नेरळ आणि शेलू या दोन्ही ग्रामपंचायतमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र तेथील रहिवाशांना रस्ते आणि पाणी या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र आमदार थोरवे यांनी भरघोस निधी देऊन दोन्ही गावाचा कायापालट केला आहे. रस्ते आणि पाण्याची समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे.
पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन प्रसंगी सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, तालुका सचिव अंकुश दाभणे, जयवंत साळुंखे, उपतालुका प्रमुख अंकुश शेळके, माजी सरपंच जान्हवी साळुंखे, शंकर घोडविंदे, विभाग प्रमुख सुरेश राणे, सुभाष मिणमिणे, संपर्क प्रमुख किसन शिंदे, आबासाहेब पवार, उपशहर प्रमुख आशुतोष गडकरी, उपशहर प्रमुख पंढरीनाथ चंचे, सचिन खडे, नगरसेवक संकेत भासे, युवा तालुका प्रमुख अमर मिसाळ, उपप्रमुख प्रसाद थोरवे, सदस्य प्रभाकर देशमुख, धर्मानंद गायकवाड, शेलू ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी खारीक, माजी सभापती आरती भगत, नरेश म्हसणे, ज्ञानेश्वर भगत, भाजपचे नितीन कांदगावकर, नगरसेवक बळवंत घुमरे, सरचिटणीस दिपक बेहेरे , रमेश कदम आदी उपस्थित होते.

पाण्याची समस्या दूर होणार
गेले अनेक वर्षापासून या भागातील महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. काही किलो मिटर अंतरावर जाऊन फॉर्म हाऊस, खासगी बंगल्यांमधून पाणी घ्यावे लागत होते. तर कधी कधी खासगी जागेतून बोअरवेलमधून पाणी घेण्यासाठी रक्कमही मोजावी लागत असल्याचे काही महिलांकडून सांगण्यात आले. अतिगरजेनुसार टँकरने पाणी आणल्यास त्यातून कचरा येत असे तर कधी कोंबड्यांची पिसे त्या पाण्यातून येत असत, त्यामुळे नाईलाजाने तेच पाणी वापरावे लागत होते. मात्र आमदार थोरवे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यांच्यामुळे आता पाण्याची समस्या दूर होणार आहे, असेही काही महिलांनी सांगितले.
———

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -