घरताज्या घडामोडीमनसेच्या सभांबाबत राज म्हणाले; 'जाणीवेतून भाषण नाही करत...'

मनसेच्या सभांबाबत राज म्हणाले; ‘जाणीवेतून भाषण नाही करत…’

Subscribe

हे स्किल-बिल काही नाहीये. मला जे बोलायचं ते मी बोलतो. मी मागे आमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोललो होतो, तेव्हा खूप वाद झाला होता. अमिताभ बच्चन या एवढ्या मोठ्या माणसाला त्यांच्या राज्याबद्दल एवढा अभिमान आहे, तर माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला माज्या राज्याबद्दल अभिमान असणारच ना'', असे राज ठाकरे म्हणाले.

मनसेच्या सभेत भाषण करताना मी मला जाणीवेतून बोलत नाही. त्यावेळी मला जे वाटतं ते मी बोलतो, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. तसेच, ‘मला घरात जे वातावरण मिळालं, व्यंगचित्रांचा वारसा माझ्यात आला, बातमीतून व्यंगचित्र कसं शोधावं, ते मला कळतं. तोच अभ्यास माझ्या भाषणाला उपयोगी पडतो’, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. (MNS Chief Raj Thackeray Talk On Their Speech In mns meet)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरेंना भारतात दोन अशी व्यक्ती आहेत, जी बोलले तरी बातमी होते आणि न बोलले तरी बातमी होते. एक शरद पवार आणि दुसरे राज ठाकरे. ही दोन व्यक्तीमत्व अशी आहेत, ही बसल्या जागी देशभरातील मीडियाला कामाला लावू शकतात. मीडियाला हँडल करण्याचे स्किल तुम्ही कसे आत्मसात केले? असा प्रश्न विचारण्यात आला.

- Advertisement -

या प्रश्नावर उत्तर देताना “हे स्किल-बिल काही नाहीये. मला जे बोलायचं ते मी बोलतो. मी मागे आमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोललो होतो, तेव्हा खूप वाद झाला होता. अमिताभ बच्चन या एवढ्या मोठ्या माणसाला त्यांच्या राज्याबद्दल एवढा अभिमान आहे, तर माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला माज्या राज्याबद्दल अभिमान असणारच ना”, असे राज ठाकरे म्हणाले.

यानंतर पुढचा प्रश्न राज ठाकरेंना तुमचे भाषण सचिन तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राइव्हसारखे फ्लॉलेस आणि धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखं फटकेबाज असते. तुम्हाला तुम्ही बोलत असलेल्या प्रत्येक शब्दाची जाण आहे, असे जाणवते असा विचारण्यात आला. यावरही त्यांनी थेट उत्तर दिले. “तुम्हाला समोरुन काय जाणवतं माहिती नाही, पण मी त्या जाणीवेतून भाषण नाही करत. मला घरात जे वातावरण मिळालं, व्यंगचित्रांचा वारसा माझ्यात आला, बातमीतून व्यंगचित्र कसं शोधावं, ते मला कळतं. तोच अभ्यास माझ्या भाषणाला उपयोगी पडतो. नेमकं पाहणं, त्यातूनच मला आलंय. तुम्ही जेवढा माझ्या भाषणाचा विचार करता, तेवढा मीदेखील करत नाही. जेनेटिकली हजरजबाबीपणा आला असेल, बाकी काही नाही”, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सत्तेचा साबण खूप वेगळा असतो’, नेत्यांवरील छापेमारीवर राज ठाकरेंचे स्पष्ट मत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -