घररायगडपनवेल, कामोठेतील एमजीएम रुग्णालयात पंखा पडल्याने महिला रुग्ण जखमी

पनवेल, कामोठेतील एमजीएम रुग्णालयात पंखा पडल्याने महिला रुग्ण जखमी

Subscribe

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.फुफ्फुसाच्या आजारणे ग्रस्त असलेल्या एका महिला रुग्नाच्या अंगावर पंखा पडून यात त्या जखमी झाल्या आहेत. या मुळे त्यांच्या डोक्याला चार टाके पडल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे.

पनवेल: कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.फुफ्फुसाच्या आजारणे ग्रस्त असलेल्या एका महिला रुग्नाच्या अंगावर पंखा पडून यात त्या जखमी झाल्या आहेत. या मुळे त्यांच्या डोक्याला चार टाके पडल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, घटने नंतर या बाबतची माहिती वाळंज यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली. रुग्णालय प्रशासनातील अधिकार्‍यानी तोंडी तोंडी माफी मागून वेळ मारून नेल्याची माहिती रुग्णांचे नातेवाईक प्रदीप वाळंज यांनी दिली आहे.
कामोठे येथील एमजीएम रुग्णालय नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. एमएमजीएम रुग्णालयातच काही दिवसा पूर्वी मृतदेहाच्या अदलाबदलीचा प्रकार घडला होता तर आता फुफ्फुसाच्या आजारामुळे शस्त्रक्रिये साठी दाखल असलेल्या महिला रुग्नाच्या अंगावर पंखा कोसळण्याची घटना घडली आहे. रत्नागिरी येथील प्रिया वाळंज या फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना उपचारासाठी गरज असल्याने २० डिसेंबर रोजी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.२१ डिसेंबर रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सात दिवसानंतर महिलांसाठी असलेल्या सामान्य कक्षात हलवण्यात आले.

नशीब बलवत्तर म्हणून 
सामान्य कक्षात असताना २८ डिसेंबर रोजी दुपारी घडलेल्या घटनेनुसार सामान्य कक्षातील छतावर सुरु असलेला पंखा अचानक कोसळला. शस्त्रक्रियेनंतर आराम करत असलेल्या वाळंज यांना भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर हा पंखा कोसळून फिरत्या पंख्याच्या पात्याने वाळंज यांच्या डोक्याला जखम झाली आहे.यामुळे त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.नशीब बलवत्तर म्हणून घडलेल्या या अपघातात वाळंज यांच्या डोक्यावर निभावले असल्याची भावना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -