घररायगडनाटकाच्या प्रयोगाचे पैसे दिले दोन बहिणींच्या उपचारासाठी, छुमंतर नाटकाच्या टीमचा उदारपणा

नाटकाच्या प्रयोगाचे पैसे दिले दोन बहिणींच्या उपचारासाठी, छुमंतर नाटकाच्या टीमचा उदारपणा

Subscribe

प्रा.वसंत कानेटकर लिखित आणि राजा अत्रे दिग्दर्शित श्री स्वामी निर्मित ‘छुमंतर’ या विनोदी नाटकाचा प्रयोग दोन दिवसांपूर्वी चौक येथील सरनोबत नेताजी पालकर हायस्कूल येथे सादर करण्यात आला. चौकच्या नागरिकांनी नाटकाला गर्दी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट तसेच नाटकांना प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दोन वर्षांपासून आर्थिक घडी विस्कळीत झालेली असताना हे हाऊसफुल्लचे बोर्ड कलाकारांना समाधान देणारे ठरत आहेत. अशा परिस्थितीत नाटकाच्या कलाकारांनी दाखवलेला उदारपणा कौतुकास पात्र ठरताना दिसत आहे.या नाटकाच्या तिकिटातून मिळालेली रक्कम दोन मुलींच्या शस्त्रक्रियेसाठी दिल्याने कलाकारांचे कौतुक होत आहे.

प्रा.वसंत कानेटकर लिखित आणि राजा अत्रे दिग्दर्शित श्री स्वामी निर्मित ‘छुमंतर’ या विनोदी नाटकाचा प्रयोग दोन दिवसांपूर्वी चौक येथील सरनोबत नेताजी पालकर हायस्कूल येथे सादर करण्यात आला. चौकच्या नागरिकांनी नाटकाला गर्दी केली होती. या नाटकातून मिळालेली ८१ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम स्वराली आणि स्वरांजली या दोन बहिणींच्या उपचारासाठी देण्यात आली आहे. स्वरांजली आणि स्वराली या दोन बहिणींवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यांच्यावर उपचारासाठी मोठा खर्च लागणार असल्याने छुमंतर या नाटकाच्या टीमने समाजापुढे आदर्श निर्माण करत प्रयोगातून मिळालेली रोख रक्कम त्यांच्या पालकांना दिली आहे.

- Advertisement -

एवढेच नाही तर या नाटकाचे अजून ९ प्रयोग असून त्यातून जेवढी रक्कम जमा होईल ती या दोघी बहिणींच्या उपचारासाठी देण्यात येईल असेही नाटकाच्या टीमने सांगितले. येत्या ६ मार्च रोजी कर्जत येथील रॉयल गार्डन येथे छुमंतर नाटकाचा प्रयोग होणार आहे. नाटकाच्या टीमने प्रेक्षकांना आवाहन केले आहे की, एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो. स्वराज्यरक्षक संभाजी आणि ती परत आलीये या मालिकेतील अभिनेता देवेंद्र सरदार यांनी या नाटकात चिमाजी आप्पांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. स्नेहा पाटील, दर्शना कुलकर्णी सरदार, ऋषिकेश पिंगळे, स्नेहल तटकरे, साहिल परब, प्रमोद कार्ले, ऋषिकेश घाग, सचिन पोळेकर या कलाकारांनी नाटकातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नाटकाचे अजून ९ प्रयोग होणार असून त्यातून मिळणारी रक्कम या दोन्ही बहिणींच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. नाटकाच्या टीमने घेतलेला हा निर्णय स्तुत्य ठरला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा टीमने बाळगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -