घररायगडइलेक्ट्रीक बाईक ठरतेय नागरिकांची पसंद

इलेक्ट्रीक बाईक ठरतेय नागरिकांची पसंद

Subscribe

शासनानेही आता इलेक्ट्रिक वाहन धोरण राबविण्यास परवानगी दिली आहे. पर्यावरणपूरक, प्रदूषणविरहित आणि चार्जिंग करून चालणार्‍या इलेक्ट्रिक बाईकमुळे पैशाची बचत होत असल्याने, ग्राहकांची पसंती आता या बाईकला वाढलेली आहे. विशेष म्हणजे २५ किमी स्पिड असलेल्या मॉडेलला आरटीओ नोंदणीची गरज नाही.

पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने दुचाकी चालकांच्या खिशावर चांगलाच भुर्दड पडत आहेत. एका किलोमीटरसाठी तीन ते चार रुपये मोजावे लागत आहेत. भविष्यात पेट्रोलचे दर कमी होणार नाही याची खात्री पटलेल्या ग्राहकांनी आता इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक शोरुममध्ये गर्दी वाढत आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग आणि पनवेल या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईकची शोरुम आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८००पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बाईकची विक्री झाली आहे. इलेक्ट्रिक बाईक एकदा चार्जिंग केली की १०० ते १२० किमीपर्यत धावते. यासाठी विजेचा खर्च होत असला तरी तो देखील साधारणत: १२ ते १७ रुपये इतका असू शकतो.

पेट्रोलच्या ११० रुपयांच्या तुलनेत १७ रुपये परवडत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. शासनानेही आता इलेक्ट्रिक वाहन धोरण राबविण्यास परवानगी दिली आहे. पर्यावरणपूरक, प्रदूषणविरहित आणि चार्जिंग करून चालणार्‍या इलेक्ट्रिक बाईकमुळे पैशाची बचत होत असल्याने, ग्राहकांची पसंती आता या बाईकला वाढलेली आहे. विशेष म्हणजे २५ किमी स्पिड असलेल्या मॉडेलला आरटीओ नोंदणीची गरज नाही. लायसन्सदेखील लागत नाही. त्यामुळे १८ वर्षांखालील शाळा कॉलेजला जाणार्‍या मुलांना लो मॉडेल हे उत्तम पर्याय आहे. स्पीडदेखील कमी असल्यामुळे मुले वेगाने गाडी चालवतील याची भिती आणि अपघाताचे धोकेही आपोआप कमी होतात.

- Advertisement -

इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा कल जास्त आहे. मात्र कोरोनामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रालाही फटका बसला असल्याने काही स्पेअर पार्ट उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना वाहन देण्यास दिरंगाई होत आहे. मात्र, ही अडचण कोरोना असल्यामुळे होती. लवकरच सर्व सुरळीत होईल असे वितरकाचे म्हणणे आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -