घरराजकारणCM Shinde Vs Thackeray : उंटावर बसून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही;...

CM Shinde Vs Thackeray : उंटावर बसून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिशन 48, शिवसेनेचा शिवसंकल्प अभियानाची आज सोमवार (8 जानेवारी) पासून रत्नागिरीतून सुरूवात झाली आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले.

रत्नागिरी : केंद्र शासनाने गेल्या दीड वर्षांत या महाराष्ट्रातील जनतेसाठी जे- जे काही केलं त्याची एक पुस्तिका तयार करू आणि ती पुस्तिका देखील आपण घराघरामध्ये लोकांना पोहोचवली पाहिजे. कारण त्याच्यातून त्यांना माहिती पडेल की, शासनाने कोणते-कोणते निर्णय घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपला पक्ष जोडण्याचं काम देखील आपल्याला करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की, मी फिल्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून, उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. (CM Shinde Vs Thackeray I am not a CM who rides a camel and calls goats Shindes challenge to Thackeray)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिशन 48, शिवसेनेचा शिवसंकल्प अभियानाची आज सोमवार (8 जानेवारी) पासून रत्नागिरीतून सुरूवात झाली आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले.

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी प्रत्यक्ष फिल्डवर जातो, काम करतो. स्वच्छता अभियान सुरू केलं, तर तिकडे पोटदुखी सुरू झाली. कारण लोकं त्याच्यामध्ये सहभागी होऊ लागले. पण फक्त मुंबई स्वच्छ करून मी थांबणार नाही. तर या महाराष्ट्रामध्ये हे deep clean drive, स्वच्छता मोहीम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवू. महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर करू आणि त्याचबरोबर जे कोणी या विकासाच्या विरोधात आपल्या उतरतील त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईलच आणि म्हणून आज सर्वसामान्य माणसाचं आयुष्य आहे त्यांच्यामध्ये जीवनामध्ये बदल आपल्याला घडवायचा आहे. असेही वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.

हेही वाचा : Salman Khanच्या फार्महाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; दोन जणांना अटक, बनावट आधारकार्ड जप्त

- Advertisement -

तेव्हा इंडिया आघाडी गाजर खात होती

चार राज्यामध्ये निवडणूका झाल्या त्यावेळेस देखील India आघाडी खुशीमध्ये गाजरं खात होती. परंतु या तीन- चार राज्यातील लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि मोदींची गॅरंटी लोकांनी स्वीकारली. त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि म्हणून आज आपल्याला एवढंच मला विचारायचं आहे की, आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करणारा माणूस आपल्याला पाहिजे की, या देशासाठी एक एक दिवस एक एक क्षण समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे हा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. म्हणून कुणाला काय मिळेल? यापेक्षा मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय दिलं? माझ्या राज्याला काय दिलं? माझ्या जिल्ह्याला काय दिलं? हे महत्वाचं आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : CM Shinde Vs Thackeray : आम्ही सत्तेसाठी नाही, तत्वासाठी बाहेर पडलो; CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

जर आम्ही निर्णय घेतला नसता तर…

राज्याचा विकास करत असताना केंद्राकडून आपल्याला पूर्ण पाठबळ मिळतंय. एकही पैशाची कपात न करता आपले सर्व प्रस्ताव मान्य केले जातात. आणि पूर्वी केंद्राकडे पैसे मागितले जात नव्हते अहंकारापोटी. अंगी असलेल्या गर्वापोटी, परंतु तुम्ही अडीच वर्षात हा महाराष्ट्राला किती वर्ष मागे नेला? जर आपण हा निर्णय घेतला नसता तर आज काय परिस्थिती असती? आपण कुठे असतो? तुम्ही कुठे असता? हा विचार करुन आपण निर्णय घेतलाय. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये विकासाचं काम करतेय. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -