घररायगडशितो रितू कराटे चॅम्पियन स्पर्धेत मुरुडच्या स्पर्धकांचे मोठे यश.

शितो रितू कराटे चॅम्पियन स्पर्धेत मुरुडच्या स्पर्धकांचे मोठे यश.

Subscribe

नेहुलीतील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या पहिल्या आमदार चषक आणि २३ वी शितो रियू कराटे चॅम्पियनशिप (काता अँड कुमिते/ फाईट) स्पर्धेत मुरुडच्या स्पर्धकांनी मोठे यश मिळवले.जपान शितो रियू कराटे डो, इंडिया ही संस्था आणि शिहान तसेच राहुल तावडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून तीनशे हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

नांदगाव: नेहुलीतील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या पहिल्या आमदार चषक आणि २३ वी शितो रियू कराटे चॅम्पियनशिप (काता अँड कुमिते/ फाईट) स्पर्धेत मुरुडच्या स्पर्धकांनी मोठे यश मिळवले.जपान शितो रियू कराटे डो, इंडिया ही संस्था आणि शिहान तसेच राहुल तावडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून तीनशे हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मुरुडमधील दोन विद्यार्थ्यांनी बेस्ट फायटर हा सन्मान मिळविला तसेच ४ सुवर्णपदके, ७ रौप्य पदके आणि २९ कास्यपदके मिळवून या खेळाडूंनी बाजी मारली. यात सुमित पवार: सुवर्णपदक व कास्यपदक (बेस्ट फाइटर ट्रॉफी); आराध्य गुंजाळ : सुवर्णपदक, रौप्य पदक; शुभमकरा राजे : सुवर्णपदक , कांस्यपदक; योग भगत: दोन कास्यपदक; अनमोल मांदडकर: रौप्य पदक, कांस्यपदक; ऋग्वेद तळेकर: दोन कास्यपदक; नऊ पवार:सुवर्णपदक, रौप्य पदक (बेस्ट फायटर ट्रॉफी); अथांग कवळे: रौप्य पदक, कांस्यपदक; अन्वेषा मयेकर: रौप्य पदक, कांस्यपदक; आस्था अपराध: दोन कास्यपदक; स्नेहाला पाटील: दोन कास्यपदक; आराध्या पाटील : दोन कास्यपदक; दर्शन सिंग: दोन रौप्य पदक; अचिंत्य सिंग: दोन कास्यपदक; आरणा पाटील: दोन कास्यपदक; साद बेपारी: दोन कास्यपदक; शिफा बेपारी: दोन कास्यपदक; सायेमा बेपारी: दोन कास्यपदक; सौलीहा बेपारी: दोन कास्यपदक यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -